IPL 2021: आंद्रे रसेलने भर मैदानात एकदा नाही तर तब्बल पाचवेळा हरभजन सिंहची केली ‘बेइज्जती’, कारण वाचून हैराण व्हाल

IPL 2021: हरभजन सिंह (Harbhajan Singh)पहिल्यांदा केकेआरसाठी खेळत आहे. यापूर्वी तो चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. Andre Russell Harbhajan Singh

IPL 2021: आंद्रे रसेलने भर मैदानात एकदा नाही तर तब्बल पाचवेळा हरभजन सिंहची केली ‘बेइज्जती’, कारण वाचून हैराण व्हाल
आंद्रे रसेल हरभजन सिंह

चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 38 धावांनी विजय मिळवला आहे. बंगळुरुने कोलकाताला विजयासाठी 205 धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 166 धावाच करता आल्या. कोलकाताचा तीन सामन्यांमध्ये दुसरा पराभव ठरला. कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. कोलकाताला अखेरच्या ओव्हर्समध्ये मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. कोलकाताचा प्रमुख फलंदाज आंद्रे रसेल 19 व्या ओव्हरमध्ये स्टाईकवर होता. त्यानं पूर्ण ओव्हरमध्ये अवघी एक रन केली. नॉन स्ट्राईकला असलेल्या हरभजन सिंहला त्यानं एकदाही स्ट्राईक दिली नाही. (Andre Russell did not gave strike to Harbhajan Singh in match RCB vs KKR IPL 2021)

रसेलचा हरभजनवर अविश्वास

हरभजन सिंह हा अखेरच्या ओव्हर्समध्ये मोठे फटके लगावण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र. आंद्रे रसेलन त्यावर एकदा नाहीतर तब्बल पाचवेळा अविश्वास दाखला. कोलकाताला अखेरच्या 2 ओव्हर्समध्ये 44 धावा हव्या होत्या. त्यावेळी विराट कोहलीनं 19 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजला बॉलिंग दिली. सिराजनं कॅफ्टनचा विश्वास सार्थ ठरवला. त्यानं रसेलला ऑफसाई़डवर यार्कर लेंथवर बॉलिंग केली. पूर्ण ओव्हरमध्ये रसेलने फटके लगावले मात्र, त्याला मोठे शॉट मारता आले नाहीत. पहिल्या रसेलनं थर्ड मॅनला फटका लगावला, मात्र, रन घेणाऱ्या हरभजनला त्यानं धावण्यास मनाई केली. पुढील चार बॉलवर हेच चित्र कायम राहिलं. हरभजन सिंहला नॉन स्ट्राईकर म्हणून राहावं लागलं. पहिल्या 5 बॉलवर एकही रन झाली नाही. अखेरच्या बॉलवर रसेलनं एक रन घेतली.

हरभजन पहिल्यांदाच कोलकाताकडे

मॅचच्या अखेरच्या ओव्हरमध्ये स्ट्राईकवर आंद्रे रसेल होता. हर्षल पटेलनं पहिल्याचं चेंडूवर रसेलचा बोल्ड काढला. आंद्रे रसेल 20 चेंडूवर 31 धावा करुन बाद झाला. त्यानं या खेळीदरम्यान तीन चौकार आणि 2 षटकार लगावले. हरभजन सिंह पहिल्यांदा केकेआरसाठी खेळत आहे. यापूर्वी तो चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.

संबंधित बातम्या:

IPL 2021 : मॅक्सवेलची दमदार खेळी, सेहवागने बघता बघता प्रिती झिंटाला ट्रोल केलं!

RCB vs KKR, IPL 2021 Match 10 Result | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सलग तिसरा विजय, कोलकातावर 38 धावांनी शानदार विजय

(Andre Russell did not gave strike to Harbhajan Singh in match RCB vs KKR IPL 2021)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI