INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा

| Updated on: Oct 30, 2020 | 12:15 AM

एकदिवसीय मालिकेपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात होणार आहे.

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा
Follow us on

मेलबर्न : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (INDIA TOUR AUSTRALIA) जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने इंडियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी 20 मालिकेसाठी टीमची घोषणा केली आहे. अॅरॉन फिंच एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. कॅमरन ग्रीन या युवा खेळाडूला ऑस्ट्रेलिया संघात स्थान देण्यात आलं आहे. तसेच बीग बॅश लिगमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या मोईजेस हेनरिक्सने तब्बल 3 वर्षांनंतर टीममध्ये पुनरागमन केलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्यात कसोटी मालिकेआधी 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. Announcement of Australia squad for ODI and T20 series against Team India

ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे. या एकदिवसीय मलिकेची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून होणार आहे. तर टी 20 मालिका 4 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे.

अशी आहे ऑस्ट्रेलियाची एकदिवसीय आणि टी 20 टीम :

एरॉन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एश्टन एगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डेनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टॉर्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 26 ऑक्टोबरला टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती. बीसीसीआयने एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी अशा तिन्ही मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. यामध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमात चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये वरुण चक्रवर्थी, नवदीप सैनी यासारख्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

एकदिवसीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि वरुण चक्रवर्ती

संबंधित बातम्या :

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

India Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून संधी

Announcement of Australia squad for ODI and T20 series against Team India