Anupam kher : अनुपम खेर यांचा रियल लाइफमधील हिरो कोण? नाव ऐकून तुम्ही हैराण व्हाल

नाव ऐकून तुम्ही हैराण व्हाल पण तुम्हाला अभिमानही वाटेल

Anupam kher : अनुपम खेर यांचा रियल लाइफमधील हिरो कोण? नाव ऐकून तुम्ही हैराण व्हाल
Anupam kher
Image Credit source: instagram
| Updated on: Sep 20, 2022 | 7:29 PM

मुंबई: प्रत्येक व्यक्तीसाठी हिरोचा अर्थ वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाच हिरोही वेगळा असतो. दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या रियल लाइफ हिरोबद्दल खुलासा केला आहे. नाव ऐकून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. पण तुम्हाला त्यांचा अभिमानही वाटेल. अनुपम खेर यांच्या रियल लाइफमधील हिरोचं नाव आहे हिमा दास.

अनुपम खेर यांची हिरो त्यांच्यापेक्षा वयाने लहान

अनुपम खेर यांच्यासाठी हिरो असलेली हिमा दास त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे. पण या मुलीने भारताच नाव उज्वल केलं आहे. धावपटू हिमा दास देशाचा सन्मान वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.

अनुपम खेर यांच्यातोंडून हे शब्द निघाले

हिमा दास आता अवघ्या 22 वर्षांची आहे. आयएएएफ वर्ल्ड अंडर 20 एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं. हिमाने 51.46 सेकंद वेळेसह विजय मिळवला होता. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मोटिवेशनल स्पीकर अनुपम खेरही तिचे चाहते आहेत. अनुपम खेर हिमा दासला गुवाहाटीमध्ये भेटले. तिला भेटून अनुपम खेर यांना प्रचंड आनंद झाला. हिमा दास माझी हिरो आहे, हे शब्द त्यांच्या तोंडून निघाले.

कू APP वर अनुपम खेर यांनी शेयर केला VIDEO

देशी सोशल मीडिया कू APP ने अनुपम खेर यांचा सुंदर व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात ते हिमा दास बरोबर चालताना दिसतायत. हिमा दासला भेटण एक प्रेरणादायक अनुभव होता, असं त्यांनी सांगितलं. पोस्टमध्ये अनुपम खेर यांनी त्याचा उल्लेखही केलाय. अनेक विषयांवर दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली.

सिल्वर मेडल जिंकलं

हिमा दासने तिचं बालपण गरीबीत घालवलं. आज तिला कुठल्या ओळखीची गरज नाही. हिमा दास आज अनेक युवा धावपटूंसाठी प्रेरणास्त्रोत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमा दासने रौप्यपदक विजेती कामगिरी केली. त्याशिवाय ती ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनही आहे.