
क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर सध्या तुफान चर्चेत आहेत. कारण सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झाला. तेंडुलकर कुटुंबियांनी गुपचूप साखरपुडा उरकला आहे. अर्जुन तेंडुलकर याने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. 13 ऑगस्ट रोजी सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा उद्योजक रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्यासोबत ढाला आहे. साखरपुड्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. अर्जुन आणि सानिया एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते का? या प्रश्नाचा उत्तर ठामपणे सांगता येणार नाही. पण सारा तेंडुलकर हिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून कळत आहे की, अर्जुन आणि सानिया एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते. एवढंच नाही तर, अर्जुन याच्या दुबई ट्रिप दरम्यान सानिया देखील त्याच्या सोबत होती… असं सांगण्यात येत आहे.
आता अशा प्रश्न उपस्थित होत आहे की, साराच्या पोस्टमध्ये असं काय खास आहे? पोस्टमध्ये सारा आणि अर्जुन यांच्या दुबई ट्रिपचे फोटो आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फोटोमध्ये सारा भाऊ अर्जुन याच्यासोबत दिसत आहे. पण दुसऱ्या फोटोमध्ये सानिया चंडोक देखील दिसत आहे. हा दावा नाहीये पण सारा तेंडुलकरने शेअर केलेल्या फोटो आणि इंस्टाग्राम पोस्टवरून हे स्पष्ट होतं की, जेव्हा अर्जुन तेंडुलकर दुबईमध्ये होता तेव्हा सानिया चांडोक देखील तिथे होती.
सारा तेंडुलकरने 10 जून रोजी तिच्या दुबई ट्रिपचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. पण, सानिया चांडोक ही तिची होणारी वहिनी आहे, हे 19 मार्च 2025 रोजी तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंवरून स्पष्ट होते. सारा हिने सानिया हिच्यासोबत काही फोटो पोस्ट केले होते. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, ‘माय प्लस वन फोरएव्हर’ असं लिहिलं होतं.
सारा आणि अर्जुन दोघेही इन्स्टाग्रामवर सानिया चांडोकला फॉलो करतात. सानियाही त्यांना फॉलो करते. याशिवाय त्यांचे अनेक एकत्र फोटोही आहेत. हे स्पष्ट आहे की ही ओळख नवीन नाही आणि आता याला एका नवीन नात्याचं नाव देण्यात आलं आहे.