Arjun Tendulkar Engagement : अर्जुन तेंडुलकर ज्यांचा जावई होणार, त्या चंडोक कुटुंबात बिझेनस साम्राज्यावरुन काय वाद?
Arjun Tendulkar Engagement : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाला आहे. सानिया चंडोक या तरुणीसोबत अर्जुनच लग्न होणार आहे. चंडोक कुटुंबाच मोठं बिझनेस साम्राज्य आहे. त्यांच्या संपत्तीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील. पण याच चंडोक कुटुंबात बिझनेस साम्राज्यावरुन वाद सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. काय आहे हे प्रकरण.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाहाच्या बोहल्यावर चढणार आहे. अर्जुन तेंडुलकरचा नुकताच साखरपुडा झाला. सानिया चंडोक या तरुणीसोबत अर्जुन तेंडुलकर विवाहबद्ध होणार आहे. अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चंडोक मुंबईतील एका मोठ्या आणि संपन्न बिझनेस कुटुंबाशी संबंधित आहे. सानियाच अर्जुन तेंडुलकरची बहिण सारा तेंडुलकरसोबत सुद्धा खास बॉन्डिंग आहे. सानिया चंडोक Graviss Group चे Non-Executive चेयरमॅन आणि प्रसिद्ध बिझनेस टायकून रवी घई यांची नातं आहे. मुंबईत एका खासगी समारंभात दोघांचा साखरपुडा झाला. दोन्हीकडची कुटुंब आणि जवळचा मित्र-परिवार या सोहळ्याला उपस्थित होता.
रवि घई Graviss Group चे माजी चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. हा ग्रुप हॉस्पिटॅलिटी आणि फूड बिझनेसमध्ये सक्रीय आहे. त्यांच्याकडे मुंबईत InterContinental Marine Drive Hotel आणि The Brooklyn Creamery सारखे मोठे ब्रांड आहेत. त्या शिवाय Graviss Hospitality Ltd नावाची एक कंपनी शेअर बाजारात लिस्टेड आहे. शेअरची करंट मार्केट प्राइस 42.92 रुपये आहे. त्या हिशोबाने कंपनीची मार्केट कॅप 302.67 कोटी रुपये आहे. ट्रेंडलाइननुसार, रवि घई यांच्याकडे कंपनीचे 21 कोटीपेक्षा जास्तचे शेअर्स आहेत.
प्रचंड पैसा, संपत्ती
Graviss Group हॉटेल, आइस्क्रीम आणि रेस्टोरेंट चेनसह फ्रोजन डेजर्ट बिझनेसमध्ये सक्रीय आहे. कंपनीचा ‘Kwality’ ब्रांड सुद्धा आइसक्रीम मार्केटमध्ये खूप लोकप्रिय आहे. ग्रुपचे हॉटेल डिवीजन हाई-अँड प्रॉपर्टीज मुंबईच्या प्रीमियम लोकेशन्सवर आहेत. Graviss Hospitality Ltd च सध्याच मार्केट कॅप 300 कोटीपेक्षा जास्त आहे. हा आंकडा फक्त लिस्टेड कंपन्यांच वॅल्यूएशन दाखवून देतो. संपूर्ण Graviss Group ची नेटवर्थ आणि प्रायवेट एसेट वॅल्यू 800 ते 1000 कोटीच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.
कुटुंबात काय वाद?
2013 साली मुंबईत कुलाबा येथील एका हॉटेलच्या वादात रवी घई यांचं नाव आलं होतं. यात प्रॉपर्टी लीज आणि मॅनेजमेंट एग्रीमेंटवरुन कायदेशीर लढाई झाली होती. नंतर या वादात तोडगा निघाला. सध्या रवी घई आणि त्यांचा मुलगा गौरव घई यांच्यात गंभीर कौटुंबिक वाद सुरु आहे. 2021 च फॅमिली सेटलमेंट एग्रीमेंट (FSA) आणि 2023 च सप्लिमेंटल एग्रीमेंट या वादाच कारण आहे. रवी घई यांनी ग्रुपच नियंत्रण मुलाकडे सोपवण्याच्या बदल्यात 235 कोटी रुपये घेतले होते. सोबतच 51% प्रमोटर शेअर गौरवला ट्रान्सफर केलेले. आता रवी घई यांनी या कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. त्यांनी हा करार रद्द करण्यासाठी मुंबई हाय कोर्टात आर्बिट्रेशनची मागणी केलीय. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलाविरोधात फसवणूकीचा खटला दाखल केला.
