Arshdeep Singh: ठरलं तर मग! अर्शदीप सिंग पलटनमध्ये सामील होणार, वडिलांनी खरं काय ते सांगून टाकलं
Arshdeep Singh IPL Trade: अर्शदीप सिंगच्या ट्रेडची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या ट्रेडबाबत आता अर्शदीप सिंगच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

IPL 2027 Trade: आयपीएल २०२७ मध्ये खेळाडूंना कायम ठेवण्यापूर्वी, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात एका मोठ्या खेळाडूच्या ट्रेडची चर्चा सुरू आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्या आणि पंजाब किंग्सचा अर्शदीप यांचा समावेश आहे. हार्दिकचा मुंबई इंडियन्सकडून पंजाबमध्ये जाण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे, तर अर्शदीप पंजाबकडून मुंबईत जाणार आहे. या बाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अनेक माध्यमांच्या वृत्तांनुसार ही ट्रेड निश्चित झाली आहे. दोन्ही संघ आणि बीसीसीआय यांच्यात अंतिम कागदपत्रांची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, अर्शदीप सिंगचे वडील, दर्शन सिंग यांनी पुष्टी केली आहे की, मुंबई इंडियन्ससोबतची त्याची ट्रेड निश्चित झाली असून ते यावर खूश आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी हॅमिल्टनमध्ये ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विमल कुमार यांच्यासोबतच्या एका यूट्यूब व्हिडिओमध्ये त्याचे वडील म्हणाले, “आम्हालाही या ट्रेडबद्दल जेव्हा कळलं आश्चर्य वाटले. आम्हाला कदाचित आताच याची सूचना मिळाली आहे की हे घडले आहे. पंजाब फ्रँचायझी त्यांच्या हृदयाच्या खूप जवळची आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या जन्मभूमीवर प्रेम करतो, मग तो कुठेही जन्मलेला असो. तो आयुष्यभर ती जागा कधीच विसरत नाही. म्हणूनच किंग्स इलेव्हन हे त्याचे जन्मस्थान होते. त्याचे त्या जागेसोबत एक घट्ट नाते आणि जिव्हाळा होता. हे थोडे वेगळे वाटते.”
अर्शदीपच्या वडिलांनी पुढे स्पष्ट केले, “प्रत्येक फ्रँचायझी संघाला संतुलन हवे असते, त्यामुळे त्यांनी त्यानुसार त्याचा सौदा केला. आम्ही मुंबई इंडियन्ससोबत खूप आनंदी आहोत. तो त्याचा जुना कर्णधार आणि दीर्घकाळचे सहकारी बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्यासोबत पुन्हा एकत्र येणार आहे, त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. चाहतेही आनंदी आहेत कारण अर्शदीप आणि बुमराह एकत्र खेळतील. ते चांगली कामगिरी करतील आणि कोणालाही २०० धावांचा टप्पा ओलांडू देणार नाहीत, तसेच धावसंख्येचा बचावही करतील.”