Asian Games 2023 | जबरदस्त, भारताने वर्ल्ड रेकॉर्डसह ‘या’ खेळात मिळवलं गोल्ड मेडल

Asian Games 2023 | भारताने एशियन गेम्स 2023 मध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकलय. त्याशिवाय आणखी एका खेळात ब्रॉन्झ मेडल मिळवलं आहे. भारताने दुसऱ्यादिवसाची सुरुवात विजयी स्क्रिप्टने केली आहे.

Asian Games 2023 | जबरदस्त, भारताने वर्ल्ड रेकॉर्डसह 'या' खेळात मिळवलं गोल्ड मेडल
Asian Games 2023Image Credit source: screengrab
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 8:57 AM

बिजींग : एशियन गेम्स 2023 मध्ये भारताने सुवर्णपदकाच खात उघडलय. भारताने आपलं पहिलं गोल्ड मेडल जिंकलं. भारताने शूटिंगच्या खेळात हे पहिलं गोल्ड मेडल मिळवलय. पुरुषांच्या 10 मीटर एयर रायफल टीम इवेंटमध्ये भारताच्या दिव्यांश सिंह पवार, रुद्रांक्ष बाळासाहेब आणि ऐश्वर्य तोमरने सुवर्णपदक मिळवलं. या टीम इवेंटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड रचला. शूटिंगशिवाय भारताने दुसऱ्यादिवशी एक ब्रॉन्झ मेडलही मिळवलं. भारताने 19 व्या एशियन गेम्समध्ये पहिल्या दिवसाची सुरुवात रौप्य पदकाने केली होती. भारताला हे मेडल सुद्धा शूटिंगच्या महिला टीम इवेंटमध्ये मिळालं होतं. पहिल्यादिवशी 3 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ मेडल जिंकणाऱ्या भारताने दुसऱ्यादिवसाची दमदार सुरुवात केली आहे. भारताने दुसऱ्यादिवसाची सुरुवात विजयी स्क्रिप्टने केली आहे. फक्त गोल्ड मेडल मिळवण्यापुरता हा विजय मर्यादीत नाहीय.

भारतीय शूटर्सनी शूटिंगमध्ये नवीन वर्ल्ड रेकॉर्ड रचलाय. म्हणजे भारतीय क्रीडा प्रेमींना सेलिब्रेशनची डबल संधी मिळालीय. पुरुषांच्या 10 मीटर एयर रायफल इवेंटमध्ये भारताचे तीन शूटर दिव्यांश सिंह पवार, रुद्रांक्ष बाळासाहेब आणि एश्वर्य तोमर उतरले होते. या तिघांनी मिळून ते गुण मिळवले, त्याने नवीन रेकॉर्ड रचला गेला. या तिघांनी मिळून 1893.7 गुण मिळवले. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. याआधी 1893.3 पॉइंट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड होता. भारताच्या तीन शूटर्सपैकी रुद्रांक्ष बाळासाहेबने सर्वाधिक 632.5 पॉइंट मिळवले. त्यानंतर एश्वर्य तोमरने 631.6 पॉइंट मिळवले. दिव्यांश पवारने 629.6 गुण मिळवले.

रोइंगमध्ये भारताला आणखी एक ब्रॉन्झ

शूटिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्डसह गोल्ड मेडल मिळवलच. पण दुसऱ्यादिवशी भारताने एक ब्रॉन्झ मेडलही मिळवलं. भारताला रोइंग म्हणजे नौकायनामध्ये हे मेडल मिळालं. मेन्स इवेंटच्या फायनलमध्ये जसविंदर, भीम, पुनित आणि आशीष यांनी 6:10.81 वेळ काढून कांस्य पदक जिंकलं.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.