IND vs BAN, Asian Games : भारतीय महिला संघाची फायनलमध्ये धडक, बांगलादेशवर 8 विकेट्सने विजय

IND vs BAN, Asian Games : एशियन गेम्सच्या सेमी फायनल सामन्यात महिला भारतीय संघाने बांगलादेश महिला संघावर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे.

IND vs BAN, Asian Games : भारतीय महिला संघाची फायनलमध्ये धडक, बांगलादेशवर 8 विकेट्सने विजय
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 9:30 AM

मुंबई : एशियन गेम्स 2023 मध्ये महिला भारतीय संघाने सेमी फायनल सामन्यात बांगलादेश संघाचा 8 विकेट्सने पराभव केलेला आहे. या विजयासह महिला भारतीय महिला संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राहरकरच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी नांगी टाकली. बांगलादेश संघाला अवघ्या 51 धावांवर गुंडाळलं होतं, भारतीय संघाने 2 विकेट्स गमावत हे लक्ष्य 9 व्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

सामन्याचा धावता आढावा

बांगलादेश संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पूजा वस्त्राहरकर हिने बांगलादेशच्या सर्वाधिक चार विकेट्स घेत फलंदाजीला सुरूंग लावला. बांगलादेश संघाच्या 5  खेळाडूंना आपलं खातंही उघडता आलं नाही. भोपळा न फोडता आलेल्या खेळाडूंमध्ये सलामीवीर शमीमा सुलताना आणि शाठी राणी यांचाही समावेश असून दोघींना पूजाने माघारी पाठवलं.

बांगलादेश संघाकडून निगार सुलताना हिने सर्वाधिक 12 धावा केल्या. बाकी एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पूजा वस्त्राहकरने 4, देविका वैद्य 1, राजेश्वरी गायकवाड 1, अमनजोत कौर 1 आणि तीतस साधू यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

भारतीय संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यावर स्मृती मानधना (7), शफाली वर्मा (17) धावांवर बाद झाल्या. जेमिमाह रॉड्रिग्स नाबाद 20 धावा आणि कनिका आहुजा नाबाद 1 खेळत भारताच्या विजयावर शिक्कमोर्तब केलं. या विजयासह फायनलमध्ये प्रवेश करत भारताने आपलं पदक पक्क केलं आहे.

बांगलादेश संघ (प्लेइंग इलेव्हन): शमीमा सुलताना, शाठी राणी, निगार सुलताना (w/c), शोभना मोस्तारी, रितू मोनी, मारुफा अक्‍टर, नाहिदा अक्‍टर, शोर्ना अक्‍टर, फहिमा खातून, सुलताना खातून, राबेया खान

भारतीय संघ (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (C), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, कनिका आहुजा, रिचा घोष (W), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.