AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय महिला खेळाडू आणि कोचला राहण्यासाठी एकच खोली, मध्यरात्री घडला भयंकर प्रकार

Asian Games 2026: आशियाई खेळांमध्ये स्टार जिम्नॅस्ट प्रणती नायक आणि प्रशिक्षक अशोक मिश्रा यांच्यासोबत जापानमध्ये भलताच प्रकार घडला.

भारतीय महिला खेळाडू आणि कोचला राहण्यासाठी एकच खोली, मध्यरात्री घडला भयंकर प्रकार
| Updated on: Sep 18, 2026 | 3:14 PM
Share

जपानमधील नागोया येथे २०२६ च्या आशियाई खेळांमध्ये भारतीय संघाला गंभीर गैरव्यवस्थापनाचा सामना करावा लागला. गेम्स व्हिलेज म्हणून वापरल्या जाणाऱ्या क्रूझ शिपवरील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, स्थानिक आयोजकांनी शिष्टाचार आणि नियमांकडे दुर्लक्ष केले. जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक अशोक मिश्रा आणि भारतीय स्टार महिला जिम्नॅस्ट प्रणती नायक यांना राहायला एकच खोली दिली. मात्र, परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अधिकाऱ्यांनी मध्यरात्री कारवाई केली.

भारतीय स्टार महिला जिम्नॅस्ट प्रणती नायक आणि जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक अशोक मिश्रा ३० तासांहून अधिकच्या थकवणाऱ्या विमान प्रवासानंतर मध्यरात्री नागोया येथे पोहोचले. यानंतर त्यांना जेव्हा समजलं की प्रशिक्षक आणि खेळाडूला राहायला एकच खोली देण्यात आली आहे तेव्हा प्रकरण चिघळले. दोघांनीही तात्काळ निर्णयाचा निषेध केला आणि स्वतंत्र खोल्यांचा आग्रह धरला. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) मध्यरात्री या प्रकरणाचे निराकरण केले आणि त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये हलवण्यात आले.

या घटनेमुळे पुन्हा एकदा गदारोळ माजला. जेव्हा प्रशिक्षक अशोक मिश्रा क्रूझ शिपच्या प्रवेशद्वारावर पोहोचले, तेव्हा गेटवर मिळालेल्या एका स्लिपवर त्यांचे नाव होते आणि त्यांना आत प्रवेश देण्यात आला. मात्र, खरा गोंधळ रिसेप्शनवर सुरू झाला. जेव्हा रजिस्टरमध्ये त्यांचे नाव तपासले गेले, तेव्हा कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांचे नाव त्यात नाही आणि त्यांची नोंदणी झालेली नाही. प्रशिक्षकाला पहाटे १ ते २ च्या दरम्यान सुमारे ४५ मिनिटे बाहेर बसण्यास भाग पाडले गेले.

नंतरच्या तपासात असे उघड झाले की, रजिस्टरमधून त्यांच्या नावातील ‘I’ हे अक्षर गहाळ होते आणि एका चुकीमुळे ‘MSHRA’ हे नाव नोंदवले गेले होते, ज्यामुळे सिस्टीममध्ये त्यांचे नाव शोधणे अशक्य झाले होते. यानंतर, आयओएच्या अधिकाऱ्यांनी नागोया येथील स्थानिक आयोजन समितीशी बोलून पहाटे १:३० ते २:०० च्या दरम्यान हा प्रश्न सोडवला. या व्यवस्थेचा एक भाग म्हणून, जिम्नॅस्ट प्रणती नायकला एक वेगळी खोली देण्यात आली, तर जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक अशोक मिश्रा यांना वेटलिफ्टिंगचे मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांच्यासोबत खोली सामायिक करण्याची परवानगी देण्यात आली.

Follow Us
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक आंदोलन!
सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील-पडळकर एकाच मंचावर
Sangli Padalkar Vs Patil : सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील- गोपीचंद पडळकर एकाच मंचावर
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअप...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअपसाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले, हा विजय...
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू