Aus vs Ind, 4th Test | क्रिकेट खेळतोय की आबाधुबी? पृथ्वीने फेकलेला चेंडू रोहितच्या हातावर आदळला, आणि….

| Updated on: Jan 15, 2021 | 1:32 PM

पृथ्वीने केलेल्या थ्रोमधून रोहित थोडक्यात बचावला.

Aus vs Ind, 4th Test | क्रिकेट खेळतोय की आबाधुबी? पृथ्वीने फेकलेला चेंडू रोहितच्या हातावर आदळला, आणि....
सतर्कतेमुळे रोहित शर्मा थोडक्यात वाचला
Follow us on

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. हा चौथा कसोटी सामना मालिकेतील शेवटचा सामना आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. तिसरा सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. टीम इंडियाला दुखपतीचं ग्रहण लागलेलं आहे. टीम इंडिया यामुळे चौथ्या सामन्यात नवख्या खेळाडूंसह उतरली आहे. या सामन्यात रोहित शर्मा एका अपघातातून सुदैवाने थोडक्यात बचावला. (aus vs ind 4th brisbane test prithvi shaw direct throw hit on rohit sharma hand)

नक्की काय झालं?

पहिल्या दिवसातील दुसऱ्या सत्रामधील खेळ सुरु होता. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. सैनीच्या जागी पृथ्वी शॉ मैदानात आला. पृथ्वीने फिल्डिंगदरम्यान हिटमॅन रोहित शर्माला टार्गेट केलं. पृथ्वीला स्टंपच्या दिशेने चेंडू थ्रो करायचा होता. पण पृथ्वीकडून थ्रोची दिशा चुकली. पृथ्वीने फेकलेला चेंडू रोहित शर्माच्या दिशेने गेला. सुदैवाने रोहितने हा थ्रो आपल्या हातावर झेलला. त्यामुळे सुदैवाने मोठी अघटित घटना घडली नाही.

वॉशिंग्टन सुंदर बोलिंग करत होता. मार्नस लाबूशेन स्ट्राईकएंडवर होता. याच ओव्हरमध्ये बॅकवर्ड शॉर्ट-लेगवर फटका मारला. त्याने रन घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू पृथ्वीच्या दिशेने गेला. पृथ्वीने लाबुशेनला रन आऊट करण्याच्या उद्देशाने चेंडू नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने थ्रो केला. मात्र तो थ्रो चुकून मिड ऑनच्या दिशेने गेला. तिथे रोहित उभा होता. रोहितची नजर त्या थ्रोवर होती.

रोहित सावध होता. थ्रो आपल्या दिशेने येतोय, हे रोहितला समजलं. त्यामुळे रोहितने तो थ्रो आपल्या हातावर झेलला. रोहितला तो फटका हातावर बसला. पण सुदैवाने मोठा अपघात टळला. तोच थ्रो रोहितला शरिराच्या दुसऱ्या ठिकाणी लागला असता, तर टीम इंडियासाठी ते कदाचित महागात पडलं असतं. पण सुदैवाने असं काही घडलं नाही.

पृथ्वी शॉ ट्रोल

रोहितला दुखापत व्हावी या उद्देशाने पृथ्वीने थ्रो केला नाही. मात्र यातून रोहितला दुखापत होण्याची शक्यता होती. मात्र या चुकीच्या थ्रोमुळे आणि या साऱ्या प्रकरामुळे पृथ्वी चांगलंच ट्रोल केलं जातं आहे. अनेक मीम्सद्वारे पृथ्वीवर ट्रोलधाड केली जात आहे.

पाहा भन्नाट मीम्स

संबंधित बातम्या :

Aus vs Ind, 4th Test, 1st Day : मार्नस लाबुशेनची शतकी खेळी, पहिल्या दिवसखेर ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 274 धावा

(aus vs ind 4th brisbane test prithvi shaw direct throw hit on rohit sharma hand)