Ind Vs Aus : भारताविरुद्ध डे नाईट प्रॅक्टिस मॅचसाठी ऑस्ट्रेलिया A टीम घोषित, पाहा कोणाकोणाचा समावेश?

| Updated on: Dec 09, 2020 | 3:10 PM

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान (Australia A vs India 2nd Practice match) दुसरी प्रॅक्टिस मॅच 11 डिसेंबरला सिडनी क्रिकेट ग्राऊंटवर खेळवण्यात येणार आहे.

Ind Vs Aus : भारताविरुद्ध डे नाईट प्रॅक्टिस मॅचसाठी ऑस्ट्रेलिया A टीम घोषित, पाहा कोणाकोणाचा समावेश?
Follow us on

सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान (Australia A vs India 2nd Practice match) दुसरी प्रॅक्टिस मॅच 11 डिसेंबरला सिडनी क्रिकेट ग्राऊंटवर खेळवण्यात येणार आहे. प्रॅक्टिस मॅचसाठी ऑस्ट्रेलिया A टीमची घोषणा केली गेली आहे. अ‌ॅलेक्स कॅरीकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारत A आणि ऑस्ट्रेलिया A दरम्यान पार पडलेली पहिली मॅच ड्रॉ झाली. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या प्रॅक्टिस मॅचसाठी पहिल्या मॅचमध्ये खेळलेल्या पाच खेळाडूंना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. (Australia A Squad Announced Second practice match Against india)

ऑस्ट्रेलियाकडून जो बर्न्स, कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरिस, निक मॅडिंसन आणि मार्क स्टेकेटी यांना पुन्हा एकदा दुसऱ्या मॅचसाठी संधी देण्यात आली आहे. अ‌ॅलेक्स कॅरीशिवाय मॉइसेस हेनरिक्स, बेन मैकडरमॉट, विल सदरलँड आणि मिचेल स्वेप्सन हे देखील भारताविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या प्रॅक्टिस मॅचमध्ये खेळताना दिसून येतील.

बोलर्स मिचेल स्वेप्सन याने भारताविरुद्ध तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात बहारदार कामगिरी केली. त्याने भारताच्या प्रमुख बॅट्समनना तंबूत पाठवलं. स्वेप्सनने भारताच्या तीन विकेट्स मिळवत ऑस्ट्रेलियाला विजयाची स्वप्न दाखवली. स्वेप्सनला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी देखील चांगली साथ दिली. सरतेशेवटी भारताचा 12 रन्सने ऑस्ट्रेलियाने पराभव केला. या मॅचमध्ये मिचेल स्वेप्सनला मॅच ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

ऑस्ट्रेलियाच्या विल पुकोवस्कीला दुसऱ्या प्रॅक्टिस मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. पहिल्या प्रॅक्टिस मॅचमध्ये खेळताना भारताच्या कार्तिक त्यागीचा बॉल त्याच्या हेल्मेटवर आदळला होता. ज्यामुळे त्याला तंबूत परतावं लागलं होतं. पहिल्या प्रॅक्सिस मॅचमध्ये भारताकडून अजिंक्य रहाणे शानदार शतक ठोकलं होतं. तर चेतेश्वर पुजारा आणि ऋद्धिमान साहाने अर्धशतक ठोकलं होतं. तसंच भारतीय बोलर्सने देखील पहिल्या प्रॅक्टिस मॅचमध्ये शानदार बोलिंग केली. (Australia A Squad Announced Second practice match Against india)

संबंधित बातम्या

भारताचा यष्टीरक्षक पार्थिव पटेलची क्रिकेटमधून निवृत्ती

India vs Australia 2020 3rd T20 : हार्दिक पांड्याचा मोठेपणा, मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी नटराजनला दिली !