4 डावांत 105 रन्स, 16 बॅट्समन शून्यावर आऊट, एका दिवसांत जिंकली ऑस्ट्रेलियाची टीम, पाहा सनसनाटी मॅच…..

| Updated on: May 27, 2021 | 8:29 AM

क्रिकेटची मक्का असलेल्या लॉर्ड्स मैदानावरील एका ऐतिहासिक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने आश्चर्यकारक विजय मिळवला होता. ((Australia beat marylbone Cricket Club nine Wicket on this Day))

4 डावांत 105 रन्स, 16 बॅट्समन शून्यावर आऊट, एका दिवसांत जिंकली ऑस्ट्रेलियाची टीम, पाहा सनसनाटी मॅच.....
ही मॅच 27 मे 1878 ला लॉर्ड्स येथे खेळली गेली होती...
Follow us on

मुंबई : क्रिकेटची मक्का असलेल्या लॉर्ड्स (Lords) मैदानावरील एका ऐतिहासिक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने (Australia Cricket Team) आश्चर्यकारक विजय मिळवला होता. सामन्याचे चारही डाव केवळ एका दिवसात खेळले गेले. चार डावात दोन्ही संघांना केवळ 105 धावा करता आल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 16 फलंदाजांना खातंही उघडता आलं नाही. विरोधी संघाचा दुसरा डाव केवळ 19 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलिया आणि मेरीलबोन (Australia vs Marylebone Cricket Team) क्रिकेट क्लब यांच्यात खेळल्या गेलेल्या हा थरारक सामना होता. या रंजक सामन्याची आज आठवण काढायची म्हणजे आजच्याच दिवशी म्हणजे 27 मे रोजी हा सामना खेळला गेला होता. वर्ष होते 1878….! (Australia beat marylbone Cricket Club nine Wicket on this Day)

या सामन्यात मर्लीबॉन क्रिकेट क्लब टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. पहिल्या डावात एमसीसीची टीमचा केवळ 33 धावांत खुर्दा उडाला. फक्त एक फलंदाज केवळ दोन आकडी धावसंख्या करु शकला नाहीतर उरलेले जण एकेरी धावसंख्येवर बाद झाले. सलामीवीर माकी हॉर्नबीने सर्वाधिक 19 धावा केल्या. सहा खेळाडू शून्यावर बाद झाले. या सामन्यात फ्रेडरिक स्पॉर्थ हा ऑस्ट्रेलियन संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज राहिला. त्याने 5.3 षटकांत 4 धावा देऊन 6 बळी घेतले. हॅरी बोएलने उरलेले तीन गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची देखील तितकीच दयनीय अवस्था झाली. त्यांचा पहिला डाव 41 धावांवर गडगडला. म्हणजेच दोन्ही संघ आता समसमान स्थितीत होते. ऑस्ट्रेलियाकडून बिली मिडविन्टरने सर्वाधिक 10 धावा केल्या. तीन खेळाडूंना आपलं खातंही उघडता आलं नाही. एमसीसीकडून अल्फ्रेड शॉ आणि फ्रेड मॉर्ली यांनी पाच-पाच बळी घेतले.

16 ओव्हरमध्ये गाठलं 12 धावांचं लक्ष्य

आता सारा काही खेळ दुसऱ्या डावावर निर्भर होता. पण दुसऱ्या डावातही एमसीसीने लाजीरवाणी कामगिरीची मर्यादा ओलांडली. संपूर्ण संघ म्हणजे 10 खेळाडू 19 धावांच्या स्कोअरवर आऊट झाला. विल्फ फ्लॉवर्सने सर्वाधिक 11 धावा केल्या तर 7 खेळाडू शून्यावर तंबूत परतले. ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा हॅरी बोएलने 8.1 षटकांत 3 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या.

त्याचवेळी फ्रेडरिक स्पॉर्थने 9 षटकांत 16 धावा देऊन चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या 12 धावांचे लक्ष्य मिळाले. हे लक्ष्य गाठण्यात ऑस्ट्रेलियाला फारसा त्रास झाला नाही आणि त्यांनी 16 षटकांत एक गडी गमावून 12 धावा केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने हा सामना 9 गडी राखून जिंकला.

(Australia beat marylbone Cricket Club nine Wicket on this Day)

हे ही वाचा :

जोफ्रा आर्चर टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार? समोर आली मोठी बातमी

Video : WTC फायनलअगोदर जीममध्ये घाम, रिषभ पंतचा हा स्टंट पाहिला का?

धोनी लवकरच चेन्नईला गुड बाय करणार, चोप्रांची आकाशवाणी!