IND v AUS, Boxing Day Test | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 100 वा कसोटी सामना, कोण वरचढ ठरणार? पाहा आकडेवारी

हा दुसरा सामना उद्यापासून (26 डिसेंबर) खेळण्यात येणार आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना असणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे.

IND v AUS, Boxing Day Test | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 100 वा कसोटी सामना, कोण वरचढ ठरणार? पाहा आकडेवारी
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 12:03 PM

मेलबर्न : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Team India vs Australia) यांच्यात उद्यापासून (26 डिसेंबर) दुसरा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. हा दुसरा सामना बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामना असणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG)खेळण्यात येणार आहे. टीम इंडियाचा पहिल्या कसोटी सामन्यात लाजीरवाणा पराभव झाला. त्यामुळे टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यासाठी कसून सराव केला आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न असणार आहे. तर विजयी घोदडौद कायम ठेवण्याचा प्रयत्न कांगारुंचा असणार आहे हा सामना आणखी एका कारणाने महत्वाचं असणार आहे. (australia vs india 2nd boxing day test cricket match in melbourne cricket ground)

ऑस्ट्रेलियातील 50 वा तर एकूण 100 वा सामना

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा 100 वा कसोटी सामना असणार आहे. हा दुसरा सामनाऑस्ट्रेलियात खेळला जाणारा 50 वा सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्याला अधिक महत्तव प्राप्त झालं आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 99 कसोटी सामने खेळले गेले आहेत. या 99 पैकी 43 सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. तर टीम इंडियानेही ऑस्ट्रेलियाचा 28 सामन्यात पराभव केला आहे. तर 27 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.

बॉक्सिंग डे कसोटीत वरचढ कोण?

हा बॉक्सिंग डे कसोटी सामना असणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 8 बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळण्यात आले आहेत. या 8 पैकी 5 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवला आहे. तर 2 सामने हे बरोबरीत सुटले आहेत. टीम इंडियाला केवळ 1 सामनाच जिंकता आला आहे. यामुळे बॉक्सिंग डे आणि एकूणच कसोटी सामन्यांच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ राहिली आहे.

विराटच्या अनुपस्थितीत रहाणेवर जबाबदारी

विराट पहिल्या कसोटीनंतर आपल्या मुलाच्या जन्मासाठी भारतात परतला आहे. यामुळे उर्वरित 3 कसोटी सामन्यांमध्ये मराठमोळा अजिंक्य रहाणे नेतृत्व करणार आहे. मोहम्मद शमी दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला आहे. त्यात विराट अनुपस्थितीत आहे. यामुळे अजिंक्यचा या कसोटी मालिकेत नेतृत्वाचा कस लागणार आहे.

एकूण 4 बदल होण्याची तीव्र शक्यता

टीम इंडियाने पहिल्या सामन्यात ढिसाळ फलंदाजी केली. यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियात 4 बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये सलामीवीर पृथ्वी शॉऐवजी शुभमन गिल, विकेटकीपर रिद्धीमान साहाच्या जागी रिषभ पंत, ऑलराऊंडर हनुमा विहारीऐवजी रवींद्र जाडेजा तर दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते.

तर दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियात कोणताही बदल करण्यात येणार नाही. ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हन सोबतच खेळणार आहे, याबाबतचे संकेत प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी दिलं आहेत. दोन्ही संघ या सामन्यात दोन हात करण्यासाठी सज्ज आहेत. यामुळे या शंभराव्या आणि बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात कोण वरचढ ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

दुखापतग्रस्त टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार गोलंदाज क्रिकेटपासून आणखी काही महिने दूर

(australia vs india 2nd boxing day test cricket match in melbourne cricket ground)

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.