Australia vs India 2nd Test | दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठे बदल होणार

| Updated on: Dec 20, 2020 | 4:23 PM

दुसरा कसोटी सामना 26 ऑक्टोबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे.

Australia vs India 2nd Test | दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठे बदल होणार
Follow us on

अ‌ॅडिलेड : पहिल्या कसोटीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव (Australia vs India 1st Test) स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात ढिसाळ कामगिरीचा फटका बसला. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये काही बदल करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. दुसरा सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये एकूण 4 बदल करण्यात येणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार मिळत आहे. australia vs india for big changes in team india for 2nd test match

कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा गर्भवती आहे. लवकरच अनुष्का-विराट आई-बाबा होणार आहेत. यामुळे पहिल्या सामन्यानंतर विराट मायदेशी परतणार आहे. त्यामुळे विराटच्या जागी केएल राहुलला संधी मिळू शकते. तर दुसऱ्या डावात बॅटिंगदरम्यान मोहम्मद शमीच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळे शमी मालिकेतून बाहेर झाला आहे. यामुळे संघात शमीच्या जागेवर मोहम्मद सिराजला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

शुभमन गिल पृथ्वीची जागा घेणार?

पृथ्वी शॉ आयपीएलच्या 13 व्या मोसमापासून ढिसाळ कामगिरी करतोय. तरीही त्याची कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली. त्याला पहिल्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. मात्र पृथ्वीने पुन्हा टीम मॅनेजमेंटचा विश्वास खोटा ठरवला. पृथ्वीने पहिल्या डावात शून्य तर दुसऱ्या डावात अवघ्या 4 धावा केल्या. यामुळे पृथ्वीच्या जागी दुसऱ्या सामन्यासाठी युवा शुभमन गिलला सलामीवीर म्हणून संधी मिळण्याची तीव्र शक्यता आहे. जर शुभमनला संधी मिळाली, तर त्याचं हे कसोटी पदार्पण ठरेल.

पंतला सराव सामन्याचं बक्षिस मिळणार?

पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि विराटचा अपवाद वगळता इतर कोणत्याही बॅट्समनला चांगली खेळी करता आली नाही. कांगारुंनी भारतीय फलंदाजांना मैदानात सेट होण्याची वेळ दिली नाही. कसोटी मालिकेआधी ‘ऑस्ट्रेलिया अ’ विरोधात 2 सराव सामने खेळण्यात आले. या दुसऱ्या सामन्यात पंतने शानदार शतकी खेळी केली. त्यामुळे पंतला विकेटकीपर रिद्धीमान साहाच्या जागी संधी मिळू शकते. तसेच ऑलराऊंडर म्हणून रवींद्र जाडेजाला हनुमा विहारीच्या जागी संधी दिली जाऊ शकते. दरम्यान जाडेजाच्या प्रकृतीबाबत टीम मॅनेजमेंटकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

टीम इंडियासमोर आव्हानांची मालिका

ऑस्ट्रेलियाने आधीच 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यात मोहम्मद शमी दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला आहे. विराट पहिल्या सामन्यानंतर उपलब्ध नसणार आहे. यामुळे टीम इंडियाचा दुसऱ्या कसोटीत चांगलाच कस लागणार आहे. दुसरा कसोटी सामना हा बॉक्सिंग डे सामना असणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

Australia vs India, 1st Test | कसोटी इतिहासात टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

Australia vs India 1st Test | टीम इंडियाच्या पराभवाचे टॉप 3 व्हिलन

australia vs india for big changes in team india for 2nd test match