AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Australia vs India, 1st Test | कसोटी इतिहासात टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने एकतर्फी पराभव केला.

Australia vs India, 1st Test | कसोटी इतिहासात टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम
| Updated on: Dec 19, 2020 | 4:20 PM
Share

अ‌ॅडिलेड : ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात (Australia vs India 1st Test) टीम इंडियावर 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 90 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाने दुसऱ्या डावात अवघ्या 36 धावाच केल्या. या दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम झाला आहे. Australia vs India 1st Test No Indian player has reached double figures

नक्की काय झालं?

दुसऱ्या डावात भारतीय संघातील 3 खेळाडू शून्यावर बाद झाले. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि आर आश्विन या तिकडीला भोपळाही फोडता आला नाही. तर उर्वरित 7 खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून मयाकं अग्रवालने सर्वाधिक 9 धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात दुहेरी आकडा न करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यामुळे टीम इंडियाने ही लाजीरवाणी कामगिरी केली आहे. तसेच टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये 65 वर्षानंतर निच्चांकी धावसंख्या नोंदवली.

1955 नंतर कसोटीतील सर्वात निच्चांकी धावसंख्या

टीम इंडियाने दुसऱ्या डावात 36 धावांवर डाव घोषित केला. यासह टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 65 वर्षानंतर निच्चांकी धावसंख्या केली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात निच्चांकी धावसंख्येचा लाजीरवाणा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात 1955 मध्ये कसोटी सामना खेळण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने एका डावात 26 धावा केल्या होत्या.

दुसरा सामना 26 डिसेंबरपासून

दरम्यान बॉर्डर-गावसकर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे क्रिकेट सामना असणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच सामन्यात विजय मिळवून आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल.

संबंधित बातम्या :

Australia vs India, 1st Test | टीम इंडिया 36 धावात गारद कशी होऊ शकते? लाजिरवाण्या पराभवाची 5 कारणे

Australia vs India 1st Test | टीम इंडियाच्या पराभवाचे टॉप 3 व्हिलन

Australia vs India 1st Test No Indian player has reached double figures

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.