BCCI : रोहित-विराटला अशी वागणूक..नावचं नाही, बीसीसीआयची मोठी घोषणा

BCCI : भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं मोठं योगदान आहे. पण बीसीसीआयला याचा विसर पडलेला दिसतोय. या दोन्ही खेळाडूंनी टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय.

BCCI : रोहित-विराटला अशी वागणूक..नावचं नाही, बीसीसीआयची मोठी घोषणा
Rohit Sharma-Virat Kohli
Image Credit source: PTI/X
| Updated on: Mar 14, 2026 | 1:47 PM

BCCI Naman Awards : भारतीय क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन आणि योगदान देणार्‍या क्रिकेटपटुंना बीसीसीआय नमन (NAMAN) अवॉर्ड्स 2026 द्वारे सन्मानित करणार आहे. हा अवॉर्ड सोहळा 15 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीत होईल. बोर्डाकडून दरवर्षी विद्यमान खेळाडू, माजी खेळाडू, कोच आणि अंपायर्सना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार दिले जातात. यंदा कोणत्या खेळाडूला कोणता सन्मान मिळणार, त्याची घोषणा झाली आहे. BCCI ने घोषणा केलीय, त्यानुसार भारताच्या टेस्ट आणि वनडे टीमचा कॅप्टन शुबमन गिलला पॉली उमरीगर अवॉर्डने सन्मानित करण्यात येईल. पुरुषांसाठी हे बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटरचा अवॉर्ड आहे. शुबमन गिलला सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळणार आहे. स्मृती मंधानाला महिलांमधील बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटरचा अवॉर्ड मिळाला. हा पुरस्कार स्वीकारण्याची तिच्या करिअरमधील पाचवी वेळ असेल.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या ईरा जाधवला जगमोहन दलमिया ट्रॉफी मिळेल. देशांतर्गत बेस्ट महिला क्रिकेटरसाठी हा पुरस्कार आहे. हरियाणाच्या शेफाली वर्माला सीनियर देशांतर्गत वनडेमध्ये बेस्ट महिला क्रिकेटरसाठी जगमोहन दलमिया ट्रॉफी दिली जाईल. दुसरीकडे मुंबईच्या आयुष म्हात्रेला देशांतर्गत लिमिटेड ओवर्स टूर्नामेंटमध्ये बेस्ट ऑलराउंडर प्रदर्शनासाठी लाला अमरनाथ अवॉर्ड मिळेल. विदर्भाच्या हर्ष दुबेला रणजी ट्रॉफी मधील बेस्ट ऑलराउंडरसाठी लाला अमरनाथ पुरस्कार मिळेल. त्याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) पुन्हा एकदा बीसीसीआय देशांतर्गत टुर्नामेंटमधील बेस्ट परफॉर्मन्सचा अवॉर्ड मिळेल. कारण मुंबईने सीजनमध्ये चार विजेतेपदं मिळवली. दोन टुर्नामेंटमध्ये उपविजेते ठरले.

यावेळी नमन अवॉर्ड्समध्ये पाच आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय टीमचा सन्मान होईल. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने किताब जिंकणाऱ्या टीम्सचा एकत्र सन्मान होईल.

सीनियर पुरुष टीम : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026

सीनियर महिला टीम: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025

पुरुष अंडर-19 टीम: आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2026

महिला अंडर-19 टीम: आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2025

Follow Us