India Tour Australia | ‘हिटमॅन’ रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही? सौरभ गांगुली म्हणतो…

| Updated on: Nov 03, 2020 | 4:25 PM

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

India  Tour Australia | हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही? सौरभ गांगुली म्हणतो...
Follow us on

मुंबई : आयपीएल (IPL 2020) स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया (Indian Cricket Team) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ( India Tour Australia) जाणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टीम इंडिया या दौऱ्यात एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या तिन्हीपैकी कोणत्याही मालिकेसाठी हिटमॅनला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे रोहितच्या समर्थकांनी निराशा व्यक्त केली. “रोहित दुखापतग्रस्त आहे. त्याच्यावर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाद्वारे लक्ष दिलं जात आहे”, अशी माहिती बीसीसीआयने ट्विटद्वारे दिली होती. निवड न झाल्यानंतरही रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार का, याबाबत बीसीसीआयचा अध्यक्ष असलेल्या सौरभ गांगुलीने (BCCI President Sourav Ganguly) प्रतिक्रिया दिली आहे. bcci president saurabh ganguly information about hitman rohit sharma’s tour of australia

गांगुली काय म्हणाला?

सौरभ गांगुलीने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, “रोहित नक्कीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार. रोहित शर्मा आणि इशांत शर्मा या दोन्ही खेळाडूंवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. इशांत शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी दिली नाही. मात्र तरीही तो कसोटी मालिकेत खेळू शकतो. तसेच रोहितला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पाहायचेय. रोहित दुखापतीतून सावरल्यास, निवड समिती रोहितबाबत नक्कीच सकारात्मक विचार करेल, असं गांगुली म्हणाला.

“दमदार फलंदाजी करणारा संघ जिंकणार”

“ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणं आव्हनात्मक असेल. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथचं संघात आगमन झालं आहे. या दोघांमुळे ऑस्ट्रेलियाला आणखी बळकटी प्राप्त झाली आहे. मार्नस लाबुशानेची फलंदाजी आणखी दमदार झाली आहे. टीम इंडिया या मालिकेत विजय मिळवण्यासाठी सक्षम आहे. या मालिकेत दोन्ही संघांचा कस लागेल. दोन्ही टीमची बोलिंग साईड तुल्यबळ आहे. त्यामुळे जो संघ चांगली फलंदाजी करेल, तो संघ मालिका जिंकेल”, असंही गांगुली म्हणाला.

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अनुक्रम एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा

एकदिवसीय (वनडे) मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

दरम्यान रोहित पंजाबविरुद्धच्या डबल सुपर ओव्हर सामन्यानंतर मैदानात उतरला नाही. तेव्हापासून कायरन पोलार्ड मुंबईचे नेतृत्व करत आहे. मुंबईने प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. मुंबई आयपीएलच्या या मोसमातील अखेरचा सामना हैदराबादविरुद्ध खेळणार आहे.

संबंधित बातम्या :

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा

India Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून संधी

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

bcci president saurabh ganguly information about hitman rohit sharma’s tour of australia