टीम इंडिया भगव्या रंगात खेळणार, बीसीसीआयकडून नव्या जर्सीचा फोटो शेअर

| Updated on: Jun 28, 2019 | 8:01 PM

भारतीय संघ इंग्लंडसोबत होणाऱ्या सामन्यात भगवी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. खुद्द बीसीसीआयने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे आणि नव्या जर्सीचा फोटोही शेअर केलाय.

टीम इंडिया भगव्या रंगात खेळणार, बीसीसीआयकडून नव्या जर्सीचा फोटो शेअर
Follow us on

मुंबई : भारतीय संघ इंग्लंडसोबत होणाऱ्या सामन्यात भगवी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. खुद्द बीसीसीआयने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे आणि नव्या जर्सीचा फोटोही शेअर केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून या जर्सीची चर्चा होती. अखेर टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भगव्या जर्सीत खेळणार असल्याचं निश्चित झालंय.

भारतीय संघ भगव्या जर्सीत खेळणार असल्याची चर्चा रंगताच याला राजकीय रंगही देण्यात आला. तर काहींनी याचं समर्थनही केलं. भारतीय संघाची नवी जर्सी भगव्या रंगात आहे. या जर्सीच्या मागील बाजूस पूर्णपणे भगवा रंग आहे. पुढील बाजूस डार्क निळा रंग आहे, तर हाताला भगवा रंग आहे.

भारताचा पुढील सामना 30 जूनला इंग्लंडसोबत होईल, त्यानंतर 2 जुलैला भारत वि. बांगलादेश आणि 6 जुलैला भारत वि. श्रीलंका सामना रंगणार आहे. गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताला पहिल्या स्थानावर जाण्याची संधी आहे. अंतिम सामन्यानंतर भारत पहिल्या स्थानी असल्यास चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघासोबत भारताचा सेमीफायनल होईल.

भारताने नुकतीच वेस्ट इंडिजला धूळ चारली. या सामन्यातच टीम इंडिया भगव्या जर्सीत उतरणार असल्याचं बोललं जात होतं. वेस्ट इंडिजला 143 (34.2) धावात गुंडाळण्यात भारताला यश मिळालं. भारतीय गोलंदाजीची धार यावेळीही पाहायला मिळाली. गेल्या सामन्यात मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक घेऊन भारताला अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला, तर या सामन्यात बुमराने सलग दोन विकेट घेऊन विंडीजचं कंबरडं मोडलं. स्फोटक फलंदाज ख्रिस गेल स्वस्तात माघारी परतल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उर्वरित फलंदाजांनाही खेळपट्टीवर फार काळ टिकू दिलं नाही. हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव प्रत्येकी एक, तर यजुवेंद्र चहलने 2 विकेट्स घेतल्या.

संबधित बातम्या : टीम इंडियाच्या प्रस्तावित भगव्या जर्सीला अबू आझमींचा विरोध