
IPL 2025 मध्ये आतापर्यंत 25 सामने झाले आहेत. या दरम्यान एका टीमला मोठा झटका बसला आहे. या टीमचा स्टार खेळाडू अचानक घरी परतला आहे. म्हणजे या सीजनमध्ये हा खेळाडू या टीमचा भाग नसेल. या खेळाडूला नुकतीच फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. हा खेळाडू का परतला? त्याचं कारण अजून स्पष्ट नाहीय. दुखापतीमुळे हा खेळाडू माघारी परतल्याचा अंदाज आहे. न्यूझीलंडचा स्टार ऑलराऊंड ग्लेन फिलिप्सने गुजरात टायटन्स टीमची साथ सोडली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार तो मायदेशी परतला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून लवकरच या बद्दल अधिकृत घोषणा होईल. ग्लेन फिलिप्सला गुजरात टायटन्सने मेगा ऑक्शनमध्ये कोट्यवधी रुपयांना विकत घेतलं होतं. पण एकाही मॅचमध्ये त्याला संधी मिळाली नाही. शुभमन गिलच्या टीमचा शनिवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सामना आहे. त्याआधी टीमसाठी मोठा झटका आहे.
तो टीमच्या प्रॅक्टिसमध्येही दिसला नव्हता
6 एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यात फिल्डिंग करताना ग्लेन फिलिप्सला दुखापत झाली होती. या सामन्यात फिलिप्स गुजरातकडून सब्सीट्यूट म्हणून मैदानात उतरला होता. पण एक थ्रो करताना त्याला दुखापत झाली. त्यावेळी सहकारी खेळाडूंच्या खांद्याचा आधार घेऊन मैदानाबाहेर जावं लागलं. या दुखपतीनंतर तो टीमच्या प्रॅक्टिसमध्येही दिसला नव्हता.
या बद्दल काही अपडेट नाहीय
ग्लेन फिलिप्स गेल्यामुळे गुजरातच टेन्शन वाढलं आहे. कगिसो रबाडा सुद्धा दक्षिण आफ्रिकेला परत गेला. तो कधीपर्यंत टीम पुन्हा जॉइंन करणार या बद्दल काही अपडेट नाहीय. गुजरातच्या टीमकडे सध्या पाचच परदेशी खेळाडू आहेत. जोस बटलर, शेरफेन रदरफोर्ड, राशिद खान, गेराल्ड कोएट्जी आणि करीम जनत. टीम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 5 सामन्यात चार विजयासह टॉपवर आहे.