
लॉर्ड्स टेस्ट मॅचमध्ये टीम इंडिया एकवेळ जिंकण्याच्या स्थितीमध्ये होती. इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाकडे सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी होती. पण अखेरीस 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ही मॅच जिंकण्यासाठी इंग्लंडने एक खतरनाक प्लान बनवला होता. जसप्रीत बुमराह विरोधात त्यांनी हा प्लान केलेला. कारण बुमराह आणि रवींद्र जाडेजा मॅचच्या पाचव्यादिवशी नवव्या विकेटसाठी महत्त्वाची भागीदारी करुन टीमला विजयाच्या दिशेने घेऊन चालले होते. इंग्लंडच्या टीममध्ये गोंधळाची स्थिती होती. म्हणून कॅप्टन बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने मॅच जिंकण्यासाठी बुमराहला जखमी करण्याचा प्लान आखला होता. याचा खुलासा टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने केलाय.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने त्याच्या यूट्यूब चॅनलवरुन हा दावा केलाय. लॉर्ड्स टेस्ट मॅचमध्ये टीम इंडिया विजयासाठी 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होती. बुमराह आणि जाडेजाने नवव्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी करुन इंग्लंडची चिंता वाढवलेली. त्यावेळी यजमान संघाने म्हणजे इंग्लंडने जाणीवपूर्वक बुमराहवर बाऊन्सर चेंडूंचा मारा केला. त्याला जखमी करण्याचं प्लानिंग होतं.
प्लानिगमागचा उद्देश काय होता?
कॅप्टन बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच असं प्लानिंग होतं की, बुमराहला आऊट करता आलं नाही, तर कमीत कमी त्याला जखमी करुन मॅनचेस्टरला होणाऱ्या चौथ्या कसोटीत खेळण्यापासून रोखायचं. बुमराहने दुसऱ्या इनिंगमध्ये 54 चेंडूत 5 धावा केल्या. त्याने रवींद्र जाडेजासोबत मिळून 22 ओव्हर्समध्ये 35 धावांची चिवट भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियासाठी विजय दृष्टीपथात वाटू लागला होता.
अखेरीस इंग्लंडचा प्लान चालला
“स्टोक्स आणि आर्चर बुमराह विरुद्ध बाऊन्सर चेंडू टाकण्याची योजना बनवत होते. त्यांना बुमराहचा खांदा किंवा हाताला दुखापत पोहोचवायची होती” असा दावा कैफने केला. या दरम्यान आर्चरचा एक चेंडू बुमराहच्या बोटाला लागला. पण ही गंभीर दुखापत नव्हती. अखेरीस इंग्लंडचा प्लान चालला. बुमराह एक चुकीचा शॉट खेळताना बाद झाला.
क्रिकेट एक्सपर्टसच म्हणणं काय?
इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीज सुरु होण्याआधी ही गोष्ट स्पष्ट होती की, जसप्रीत बुमराह केवळ तीन टेस्ट मॅचमध्ये खेळणार. त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतो की, बुमराह मॅनचेस्टरच्या चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार का?. क्रिकेट एक्सपर्ट बुमराहला चौथ्या कसोटीत खेळवण्याच आवाहन करत आहेत.