शुभमन गिल आणि गाैतम गंभीर यांच्यात मोठे मतभेद, थेट भारतीय संघाला फटका, रोहित शर्मानंतर…

शुभमन गिल सध्या दुखापतग्रस्त असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. भर मैदानात त्याला त्रास झाला. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीमध्ये सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वी मोठी बातमी पुढे येताना दिसतंय. ज्याचा फटका भारतीय संघाला बसू शकतो.

शुभमन गिल आणि गाैतम गंभीर यांच्यात मोठे मतभेद, थेट भारतीय संघाला फटका, रोहित शर्मानंतर...
Shubman Gill and Gautam Gambhir
| Updated on: Nov 18, 2025 | 2:01 PM

22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भारताला मोठा झटका बसला असून शुभमन गिल याला दुखापत झाली. 15 नोव्हेंबरला पहिल्या डावात बॅटिंग करताना मानेला त्रास जाणवला. त्यानंतर शुभमन गिलला थेट रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही दुखापत इतकी जास्त गंभीर आहे की, त्याला पुढील काही दिवस आराम करावा लागणार आहे. गुवाहाटीतील दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसरा कसोटी सामन्यात शुभमन गिल दिसणार नसल्याचे स्पष्ट आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गाैतम गंभीर शुभमनच्या दुखापतीनंतर चांगलेच संतापले होते. यादरम्यानच आता गाैतम गंभीर आणि शुभमन गिल यांच्यातील मतभेद पुढे येताना दिसत आहेत. रोहित शर्मानंतर गंभीरच्या निशाण्यार कर्णधार शुभमन गिल दिसतोय.

रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने टी 20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम चांगले प्रदर्शन करत असताना गाैतम गंभीरसोबतच्या मतभेदानंतर त्याचे कर्णधारपद काढले. शुभमन गिलला हाताशी धरून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गाैतम गंभीर यांनी पुढची वाटचाल केली. मात्र, आता अवघ्या काही महिन्यातच दोघांमधील मतभेद पुढे आली आहेत.

खेळापेक्षा अधिक लक्ष गाैतम गंभीरचे खेळपट्टीवर आहे. दक्षिण आफ्रिकेला रोखण्यासाठी इडन गार्डन्सची खेळपट्टी बदलण्यात आली. मात्र, सर्वकाही उलटे झाले आणि थेट भारतीय फलंदाजच यामध्ये अडकले. भारताच्या संघाला 124 धावांचे आव्हानही गाठता आले नाही. भारतीय फलंदाजी अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेला फसवण्याच्या चक्करमध्ये भारतीय संघाचेच तीनतेरा वाजले.

भारतीय संघाच्या पराभवानंतर खेळपट्टीवरून वाद चांगलाच रंगताना सध्या दिसतोय. खेळपट्टीवरूनच गाैतम गंभीर आणि शुभमन गिल यांच्यात मतभेद आहेत. गाैतम गंभीर यांचा भर भारताच्या दृष्टिने खेळपट्टी तयार करण्यावर आहे तर शुभमन गिलचे फोकस खेळावर आहे. यामुळेच दोघांमध्ये खटके उडत आहेत. पराभवानंतर गाैतम गंभीर यांनी अजिबातच खेळपट्टीला दोष दिला नाही तर उलट खेळपट्टी चांगले असल्याचेही त्यांनी म्हटले. यामुळे आता शुभमन गिल आणि गाैतम गंभीर यांच्यातील मतभेद पुढे येत असून याचा फटका संपूर्ण भारतीय संघाला बसताना दिसतोय.