AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी घोडचूक, ‘हेलिकॉप्टर अन् विमान आजूबाजूला, तितक्यात…’; नेमकं काय घडलं?

Donald trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हवाई सुरक्षेत मोठी घोडचूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका नव्हता, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केलंय.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी घोडचूक, 'हेलिकॉप्टर अन् विमान आजूबाजूला, तितक्यात...'; नेमकं काय घडलं?
| Updated on: Aug 06, 2026 | 9:42 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हवाई सुरक्षेत मोठी घोडचूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू करण्यात आली आहे. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. राष्ट्राध्यक्ष ‘मरीन वन’ हेलिकॉप्टर आणि एक विमान एकमेकांच्या अगदी जवळ आलं होतं. हेलिकॉप्टर आणि विमान एकमेकांच्या जवळ आल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे लष्कराच्या हेलिकॉप्टरने व्हाइट हाऊसने निघाले. त्याचवेळी एअर ट्रॅपिक कंट्रालोरने चुकून रोनाल्ड रेगन विमानतळावर व्यावसायिक विमानांना थांबवलं नाही. सूत्रांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर आणि फ्लोरिडाला जाणारे विमानामध्ये सुरक्षित अंतर कमी झाल्याचे पाहायला मिळालं. परंतु हेलिकॉप्टर आणि विमानाची टक्कर होण्याची शक्यता नव्हती’.

ट्रम्प यांच्या जीवाला धोका नव्हता 

एफएएने निवेदनात म्हटलं की,  मरीन वन हेलिकॉप्टरशी संबंधित या प्रकरणाची चौकशी करत आहोत. परंतु घटनेवेळी धोकादायक परिस्थिती होती किंवा विमानाची टक्कर होणार होती, असे दिसून येत नाही’. दुसरीकडे व्हाइट हाऊसचे प्रवक्ता कुश देसाई यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला सांगितलं की, ‘मरीन वन’ हेलिकॉप्टर चालवणारे जगातील सर्वात कुशल पायलट असतात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या जीवाला कोणताही धोका नव्हता.

हवाई विमान सुरक्षेबाबत अनेक प्रश्नचिन्ह

दरम्यान, दोन विमाने एकमेकांच्या जवळ आल्याची घटना मागच्यावर्षी देखील घडली होती. दोन्ही विमानांची टक्कर झाल्याने नियम आणखी कडक करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या दुर्घटनेत 67 लोकांचा मृत्यू झाला होता. सरकारने त्या घटनेला निष्काळजीपणामुळे घटना घडल्याचं बोललं होतं. ही घटना मागील 2 दशकातील सर्वात भीषण घटना असल्याचे म्हटलं गेलं होतं. गेल्या वर्षी घडलेल्या दुर्घटनेनंतर रेगन नॅशन विमानतळाच्या आसपास हेलिकॉप्टर उड्डाणावर कायमस्वरुपी निर्बंध घातले आहे. या घटनेतील एका पीडिताने दाखल केल्याला प्रकरणात एफएए आणि लष्कराच्या निष्काळजीपाणाची भूमिका होती, असे सरकारने कबुल केले होते. तत्पूर्वी, मंगळवारी घडलेल्या घटनेवरून अमेरिकेच्या विमान सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल