
Mohammad Kaif On Rohit Sharma : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान चांगला खेळ करण्यात टीम इंडिया आणि रोहित शर्मा हे अपयशी ठरले. तसेच त्यापूर्वी न्युझीलंड विरुद्धच्या टेस्ट मॅच सीरिजमध्येही रोहित शर्माची बॅट फारशी तळपली नव्हती. मात्र या अपयशाने खचून न जाता इंग्लंडविरुद्धच्या कटक वनडेमध्ये शानदार शतक झळकावून रोहितने त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र आता चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात झाली असून आज भाराता सामना बांगलादेशशी होणार आहे. पण या स्पर्धेत भारतीय संघाचा परफॉर्मन्स ढेपाळला तर रोहित शर्माचं काय होईल ? असा सवाल अनेकांच्या मनात आहे.
लाखो क्रिकेटप्रेमींच्या मनात घोंगावणाऱ्या या प्रश्नाचं माजी भारतीय खेळाडूने उत्तर दिलं आहे. भारतीय संघातील माजी क्रिकेटपटून मोहम्मद कैफ यावर स्पष्ट बोलला आहे. त्यानवे यूट्यूब चॅनेलवर मन की बात सांगितली असून रोहित शर्माचे खूप कौतुक केलं आहे.
रोहित शर्माने कॅप्टन म्हणून जे मिळवलं…
रोहित शर्माने कर्णधार म्हणून जे काही मिळवले आहे ते प्रत्येकालाच शक्य नाही, असं मोहम्मद कैफ म्हणाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2023 च्या वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला. मात्र, त्यानंतर भारतीय संघ बरेच एकदिवसीय सामने खेळला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली तर कोचिंग स्टाफला दोष दिला जाऊ शकतो, पण त्यामुळे रोहित शर्माला काहीही फरक पडणार नाही, असे तो म्हणाला. तुम्ही कसोटी फॉरमॅटमध्ये रोहित शर्माला पर्याय शोधू शकता, पण एकदिवसीय फॉरमॅटमध्ये (त्याची जागा कोणी घेण्याचा) प्रश्नच येत नाही, असही कैफने नमूद केलं.
चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्मा अपयशी ठरला तर..
रोहित शर्माचे वनडे फॉरमॅटमधील आकडे हे सिद्ध करतात की तो कर्णधार म्हणून उत्कृष्ट आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जरी रोहित शर्मा फ्लॉप झाला तरी तो 2027 चा वनडे वर्ल्डकप खेळण्याच्या स्थितीत असेल, असा विस्वास मोहम्मद कैफने व्यक्त केला. सध्या रोहित शर्माचा फॉर्म उत्तम आहे. त्यामुळे या गोष्टीचा फायदा चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाला नक्कीच होईल, असा दावाही मोहम्मद कैफने केला.