सरावाला उशिरा येणाऱ्या खेळाडूंना एमएस धोनी काय शिक्षा द्यायचा?

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

नवी दिल्ली : जे भारतीय क्रिकेटर सरावासाठी उशिरा येत असत, त्यांना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी शिक्षा देत असे. भारतीय क्रिकेट टीमचे मेंटल कंडिशनिंग कोच राहिलेल्या पॅडी अप्टन यांनी आपल्या ‘द बेअरफूट कोच’ या पुस्तकात यांसंदर्भात उल्लेख केला आहे. क्रिकेट सरावासंदर्भात महेंद्रसिंग धोनी सर्व खेळाडूंना आधीच सांगत असे की, कुणीही मैदानात उशिरा पोहोचू नये. माजी कसोटी […]

सरावाला उशिरा येणाऱ्या खेळाडूंना एमएस धोनी काय शिक्षा द्यायचा?
Follow us on

नवी दिल्ली : जे भारतीय क्रिकेटर सरावासाठी उशिरा येत असत, त्यांना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी शिक्षा देत असे. भारतीय क्रिकेट टीमचे मेंटल कंडिशनिंग कोच राहिलेल्या पॅडी अप्टन यांनी आपल्या ‘द बेअरफूट कोच’ या पुस्तकात यांसंदर्भात उल्लेख केला आहे. क्रिकेट सरावासंदर्भात महेंद्रसिंग धोनी सर्व खेळाडूंना आधीच सांगत असे की, कुणीही मैदानात उशिरा पोहोचू नये. माजी कसोटी कर्णधार अनिल कुंबळे आणि माजी वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोन हे दोघेही क्रिकेट संघासाठी नव्या पद्धती आणि नवे विचार घेऊन आले होते, असेही पॅडी अप्टन यांनी सांगितले.

“मी जेव्हा भारतीय टीमसोबत जोडला गेलो होतो, तेव्हा अनिल कुंबळे कसोटीचा कर्णधार आणि महेंद्रसिंग दोन वन डे टीमचा कर्णधार होता. आमच्या टीममध्ये नियमांची चांगली पद्धत होती. सराव आणि मीटिंगसाठी सगळ्यांनी नियोजित वेळेत येणे बंधनकारक आहे, असे आम्ही आधीच सर्व खेळाडूंना सांगितले होते.” असे पॅडी अप्टन यांनी सांगितले.

तसेच, “कुणी खेळाडू सरावासाठी उशिरा पोहोचला, तर त्याला काय शिक्षा द्यावी, असे आम्ही खेळाडूंनाच विचारले. तेव्हा सर्व खेळाडूंनी हा निर्णय कर्णधारावर सोडला.” असे सांगत पॅडी अप्टन पुढे यांनी सांगितले की, “जो खेळाडू उशिरा पोहोचले, त्याला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असे अनिल कुंबळेने सांगितले. मात्र, धोनीची शिक्षा वेगळी होती. धोनीने सांगितले की, जर कुणी खेळाडू उशिरा पोहोचला, तर संपूर्ण टीम त्याला 10 हजार रुपये देईल.”

मात्र, वन डे टीममधील कुणीही खेळाडून सरावासाठी कधीच उशिरा येत नसे, असेही पॅडी अप्टन यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या शांत स्वभावाची पॅडी अप्टन यांनी आपल्या पुस्तकात कौतुक केले आहे. “शांत राहणं हाच धोनीची सर्वात मोठा गुण आणि क्षमता आहे. कुठल्याही स्थितीतल्या सामन्यात धोनी शांत राहतो.”, असे पॅडी अप्टन म्हणाले.