CWG 2022 : बजरंग पुनिया साक्षी मलिकची उत्कृष्ट कामगिरी, कुस्तीमध्ये भारताच्या नावावर 2 सुवर्ण पदक

बजरंग पुनियासोबतच महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनेदेखील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चांगला खेळ करीत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.

CWG 2022 : बजरंग पुनिया साक्षी मलिकची उत्कृष्ट कामगिरी, कुस्तीमध्ये भारताच्या नावावर 2 सुवर्ण पदक
बजरंग पुनिया साक्षी मलिकची उत्कृष्ट कामगिरी, कुस्तीमध्ये भारताच्या नावावर 2 सुवर्ण पदक
Image Credit source: twitter
| Updated on: Aug 06, 2022 | 6:54 AM

मुंबई – सध्या बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Bajarang Punia) चांगली कामगिरी केली असून त्याने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्या लॅचलॅन मॅकनेलीला 9-2 अशा फरकाने पराभूत केलं आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. तर एकूण सहावे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. भारताच्या Add Newसाक्षी मलिकने (Sakshi Malik) महिलांच्या 57 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिमाखदार कामगिरी केली आहे. या आगोदर सुध्दा बजंरग पुनियाने 2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंग पुनियाने चांगला खेळ कर सुवर्णपदक जिंकले होते. 2014 सालच्या कॉमनवेल्थ गेममध्ये त्याने रौप्यपदकाची कमाई केली होती .

साक्षी मलिकनेही मिळवले सुवर्णपदक

बजरंग पुनियासोबतच महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनेदेखील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चांगला खेळ करीत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. साक्षी मलिक हीने चांगली कामगिरी केली असून ही कामगिरी 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. साक्षी मलिकचा कालचा खेळ पाहण्यासारखा होता. तिच्या सामन्यात अनेकदा संघर्ष होता. त्यामुळे कालचा तिचा खेळ लोकांच्या अधिक पसंतीला उतरला आहे. सुरुवातीला ती 0-4 अशा गुणांनी पिछाडीवर होती. पण सामना अंतिम टप्प्यात आल्यानंतर साक्षी मलिकने चांगला खेळ करत प्रतिस्पर्धी कुस्तीपटूला चलाकी दाखवली. सुरुवातीला खराब कामगिरी असताना देखील साक्षी मलिकने हीने सुवर्णपदक मिळविले आहे.

भारताच्या कुस्तीवीरांची सुवर्ण भरारी

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या कुस्तीवीरांनी कमाल केलीय. बजरंग पुनिया, दीपक पुनिया, साक्षी मलिक आणि अंशु मलिक यांनी सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे. वेगळ्या-वेगळ्या वजनी गटात या खेळाडूंनी उत्तम खेळ सादर करत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला चितपट केलं. राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांच्यासह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींनी या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.