CWG 2022: Amit Panghal : अमित पंघालनं जिंकलं सुवर्ण, प्रतिस्पर्ध्याला अमितनं रडवलं

| Updated on: Aug 07, 2022 | 4:12 PM

2018 च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदकावर समाधान मानणाऱ्या पंघलने अखेर यावेळी 51 किलो वजनाचे सुवर्ण जिंकले. भारताचे 15 वे सुवर्ण आहे. अंतिम फेरीत त्याने इंग्लिश बॉक्सर मॅकडोनाल्डची धुलाई केली.

CWG 2022: Amit Panghal : अमित पंघालनं जिंकलं सुवर्ण, प्रतिस्पर्ध्याला अमितनं रडवलं
अमित पंघालनं जिंकलं सुवर्ण
Follow us on

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॉक्सर अमित पंघलने (Amit Panghal) 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने इंग्लंडच्या बॉक्सरवर ठोसा मारून आपल्या पदकाचा रंगच बदलून टाकला. 2018 च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदकावर समाधान मानणाऱ्या पंघलने अखेर यावेळी 51 किलो वजनाचे सुवर्ण जिंकले. पंघालचे हे पदक भारताचे 15 वे सुवर्ण आहे. अंतिम फेरीत त्याने इंग्लिश बॉक्सर मॅकडोनाल्डची चांगलीच धुलाई केली. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा (CWG 2022) स्पर्धेच्या 10व्या दिवशी भारतीय बॉक्सर्सनी आश्चर्यकारक कामगिरी केली. प्रथम नीतू घनघास (Nitu Ghanghas) आणि नंतर अमित पंघाल यांनी सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या 45-48 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात नीतू घनघासने इंग्लंडच्या डेमी जेडचा 5-0 असा पराभव केला. त्यानंतर अमितने अप्रतिम कामगिरी करत इंग्लंडच्या बॉक्सरचा पराभव केला.

अमित पंघालनं जिंकलं सुवर्ण

रुषांच्या 48-51 किलो गटात अमित पंघलने किरन मॅकडोनाल्डचा 5-0 असा पराभव केला. बॉक्सिंगमधील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. अमितने प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. गेल्या वेळी त्याने 2018 गोल्ड कोस्टमध्ये रौप्य पदक जिंकले होते. 2018 च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत अमितने सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये (2019) त्याचे रौप्य पदक आहे. याशिवाय त्याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण (2019), रौप्य (2021) आणि कांस्य (2017) जिंकले आहेत.

हायलाईट्स

  1. 2018 च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदकावर समाधान मानणाऱ्या पंघलने अखेर यावेळी 51 किलो वजनाचे सुवर्ण जिंकले
  2. पंघालचे हे पदक भारताचे 15 वे सुवर्ण आहे
  3. अंतिम फेरीत त्याने इंग्लिश बॉक्सर मॅकडोनाल्डची चांगलीच धुलाई केली
  4. नीतू घनघास आणि नंतर अमित पंघाल यांनी सुवर्णपदक पटकावले
  5. महिलांच्या 45-48 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात नीतू घनघासने इंग्लंडच्या डेमी जेडचा 5-0 असा पराभव केला
  6. अमितने अप्रतिम कामगिरी करत इंग्लंडच्या बॉक्सरचा पराभव केला.

नीतूबद्दल….

नीतूबद्दल बोलायचे झाले तर तिने पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकले आहे. तिने 2017 आणि 2018 च्या युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

आणखी दोन सुवर्णपदकांची अपेक्षा

बॉक्सिंगमध्ये भारताला आज आणखी दोन सुवर्णपदकांची अपेक्षा आहे. वर्ल्ड चॅम्पियन निखत जरीन 48-50 किलो (लाइट फ्लाय) गटात अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्याच वेळी, सागर अहलावतला 92+ किलो सुपर हेवीवेट प्रकारात सुवर्ण जिंकण्याची संधी असेल.