CWG 2022, Avinash sable : बीडच्या अविनाश साबळेची ऐतिहासिक कामगिरी, शेतकऱ्याच्या मुलानं देशसेवेबरोबरच खेळातही दाखवली चुनूक, जिंकलं रौप्यपदक

अविनाशनं 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये 8:11:20 अशी वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकलं आहे. विशेष म्हणजे या पदकासह अवघ्या तासाभरात भारताने ट्रॅक अँड फिल्डमध्ये दुसरे पदक जिंकले आहे. अविनाशचं कौतुक होतंय.

CWG 2022, Avinash sable : बीडच्या अविनाश साबळेची ऐतिहासिक कामगिरी, शेतकऱ्याच्या मुलानं देशसेवेबरोबरच खेळातही दाखवली चुनूक, जिंकलं रौप्यपदक
अविनाश साबळे
Image Credit source: tv9
शुभम कुलकर्णी

|

Aug 06, 2022 | 8:00 PM

नवी दिल्ली :  बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) महाराष्ट्राचा सुपुत्र बीडचा (Beed) अविनाश साबळे याने (Avinash Sable) रौप्य पदक भारताला मिळवून दिलं आहे. त्यानं 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये 8:11:20 अशी वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकलं आहे. विशेष म्हणजे या पदकासह अवघ्या तासाभरात भारताने ट्रॅक अँड फिल्डमध्ये दुसरे पदक जिंकले आहे. काही वेळापूर्वीच प्रियांका गोस्वामीने 10 किमी चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं होतं. ज्यानंतर आता अविनाशनेही रौप्य जिंकलं आहे. भारतानं आजच्या दिवशीचं पहिलं पदक मिळवलं आहे. भारताची अॅथलीट प्रियांका गोस्वामी हीने 10 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावलं आहे. प्रियांकाने 43.38 मिनिटांत 10000 मीटर अर्थात 10 किमी अंतर पूर्ण केलं असून ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने 42.34 मिनिट वेळेत हे अंतर पूर्ण करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

अविनाशची चमकदार कामगिरी

  1. विशेष म्हणजे अविनाशने हे पदक जिंकत अविनाश याने याआधी देखील अनेक वेळा चमकदार कामगिरी केलीय
  2. यावेळची कॉमनवेल्थ स्पर्धा त्याच्यासाठी खूप खास होती
  3. अविनाशने यावेळी आपली सर्वोत्तम कामगिरी करत 8 मिनिटे 11.20 सेकंद घेत शर्यत जिंकल्यामुळे एक नॅशनल रेकॉर्ड आणि स्वत:चा बेस्टही सेट केला आहे
  4. काहीशा फरकाने तो सुवर्णपदकापासून वंचित राहिला
  5. या खेळात केनियाच्या अब्राहमने 8.11.15 मिनिटं इतकी वेळ घेत सुवर्णपदक जिंकल
  6. कांस्यपदकही केनियाच्या खेळाडूने जिंकलं. आमोस सेरेमने याने 8.16.83 मिनिटांचा वेळ घेत कांस्यपदक जिंकलं.

प्रियांकानेही जिंकलं रौप्य पदक

भारतानं आजच्या दिवशीचं पहिलं पदक मिळवलं आहे. भारताची अॅथलीट प्रियांका गोस्वामी हीने 10 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावलं आहे. प्रियांकाने 43.38 मिनिटांत 10000 मीटर अर्थात 10 किमी अंतर पूर्ण केलं असून ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने 42.34 मिनिट वेळेत हे अंतर पूर्ण करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

अमेरिकेत रचला इतिहास

  1. याचवर्षी मे महिन्यात 5 हजार मीटर शर्यतीत 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत, अमेरिकेत अविनाश साबळे यांनी इतिहास रचला होता
  2. अविनाश साबळेंच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी तोफा वाजवून आनंद साजरा केला होता
  3. माझ्या मुलाने बीड जिल्ह्याचं नाव केलं आम्हाला खूप आनंद वाटतोय. असं म्हणत धावपट्टू अविनाश साबळेंच्या वडिलांची प्रतिक्रिया दिली होती.

गतवर्षी 30 जुलै 2021 रोजी टोकियोत झालेल्या, 3 हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत, अविनाश हिट 2 मध्ये सहभागी झाला होता. या हिटमध्ये त्याने आपले स्वतःचे 8.20.20 चे रेकॉर्ड मोडले. मात्र सातव्या क्रमवारीत आल्याने त्याची फायनलची संधी हुकली होती. तर यानंतर मे महिन्यात पुन्हा अविनाश यांनी 5 हजार मीटर शर्यतीत बहाद्दुर प्रसादचा 30 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें