CWG 2022: माँ का, बाप का, बहन का… सबके पास मेडल; आता मुलानेही केली पदकाची कमाई

| Updated on: Aug 05, 2022 | 11:49 AM

मुरली श्रीशंकरने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक आपल्या नावे केलंय

CWG 2022: माँ का, बाप का, बहन का... सबके पास मेडल; आता मुलानेही केली पदकाची कमाई
Follow us on

नवी दिल्ली : देशाची मान अभिमानानं उंचावणारी बातमी! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) भारताने ऍथलेटिक्समध्ये (CWG 2022) ऐतिहासिक पदक जिंकलं आहे. लांब उडीत मुरली श्रीशंकरने (Murali Srishankar) रौप्यपदक आपल्या नावे केलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारा मुरली श्रीशंकर हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे. त्याने 8.08 मीटर उडी मारून हे पदक आपल्या नावे केलंय. विशेष म्हणजे त्या कुटुंबाला पदकं जिंकण्याचा वारसा आहे. त्याचे वडील, आई आणि बहिणीनेही पदकांची कमाई केली आहे. भारताच्या या चमचमत्या ताऱ्याने आपल्या आई-वडीलांकडून खेळाची प्रेरणा घेतली. श्रीशंकर अवघ्या 23 वर्षांचा आहे. त्याचे वडील एस. मुरली हेदेखील खेळाडू राहिले आहेत. त्यांनी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक जेतेपद पटकावलं होतं. त्याची आई के.एस. बिजिमोई यांनी 1992 मध्ये आशियाई ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 800 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. श्रीशंकरची बहीण श्रीपार्वती हेप्टाथलीट आहे. श्रीशंकर गणित विषयात B.Sc करत आहे.

आई आणि वडिलांचीही पदकांची कमाई

भारताच्या या चमचमत्या ताऱ्याने आपल्या आई-वडीलांकडून खेळाची प्रेरणा घेतली. श्रीशंकर अवघ्या 23 वर्षांचा आहे. त्याचे वडील एस. मुरली हेदेखील खेळाडू राहिले आहेत. त्यांनी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक जेतेपद पटकावलं होतं. त्याची आई के.एस. बिजिमोई यांनी 1992 मध्ये आशियाई ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 800 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. श्रीशंकरची बहीण श्रीपार्वती हेप्टाथलीट आहे. वयाच्या वर्षी श्रीशंकरला त्यांच्या वडिलांनी प्रशिक्षण दिले. त्यावेळी एस. मुरली यांना आपल्या मुलामध्ये दडलेला खेळाडू गवसला.

हे सुद्धा वाचा

श्रीशंकरला टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपला ठसा उमटवता आला नाही. पण कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने आपल्या कामगिरीने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. शिवाय देशाची मान अभिमानाने उंचावली. 8.26 च्या साठी तो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. परंतु ऑलिम्पिकमध्ये श्रीशंकरला केवळ 7.69 मीटर उडी मारता आली आणि पात्रता फेरीत तो 24 व्या स्थानावर राहिला. ऑलिंपिकमधल्या अपयशामुळे त्याला थोडं खचायला झालं. पण हार जित होत राहाते आपण आपलं काम करत राहायचं. मेहनत कर, यंदा विजय तुझाच होईल, असा विश्वास त्याच्या वडिलांनी त्याला दिला. अन् त्याला यश मिळवा आलं.