CWG 2022: अमेरिकेला प्रॅक्टिससाठी पाठवलं, विश्वासू बजरंग पुनिया आज भारताला कुस्तीत मेडल मिळवून देईल का?

CWG 2022: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुढच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीचा समावेश केलेला नाही. त्यामुळे यंदाच्या कॉमनवेल्थ मध्ये दीर्धकाळ लक्षात राहील, असं यश मिळवण्याची भारतीय कुस्तीपटूंकडे संधी आहे.

CWG 2022: अमेरिकेला प्रॅक्टिससाठी पाठवलं, विश्वासू बजरंग पुनिया आज भारताला कुस्तीत मेडल मिळवून देईल का?
Bajrang-Punia
Image Credit source: AFP
| Updated on: Aug 05, 2022 | 12:58 PM

मुंबई: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुढच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीचा समावेश केलेला नाही. त्यामुळे यंदाच्या कॉमनवेल्थ मध्ये दीर्धकाळ लक्षात राहील, असं यश मिळवण्याची भारतीय कुस्तीपटूंकडे संधी आहे. खासकरुन बजरंग पुनिया आपल्या लौकीकाला साजेसा खेळ दाखवेल, अशी अपेक्षा आहे. बर्मिंघम मध्ये आजपासून कुस्ती सामने सुरु होणार आहेत. भारताकडून बजरंग पुनिया पदकासाठी सर्वात मोठा दावेदार आहे. बजरंगने टोक्यो ऑलिम्पिक मध्ये कांस्यपदक विजेती कामगिरी केली होती. यावेळी तो 65 किलो वजनी गटात 2018 गोल्ड कोस्ट मधील आपलं गोल्ड मेडल कायम ठेवण्याच्या इराद्याने मॅटवर उतरेल. बजरंग पुनिया भारताचा विश्वासू कुस्तीपटू आहे. त्याच्याकडून पदकाची अपेक्षा असली, तरी चिंता सुद्धा आहे. त्याच कारण आहे, त्याचा ढासळलेला फॉर्म.

टेक्निकची चिंता

बजरंगचा खेळ जवळून पाहणाऱ्या जाणकरांच्या मते त्याची टेक्निक थोडी कमकुवत झाली आहे. कॉमनवेल्थ आधी ते दिसून आलं. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने त्याला महिन्याभरासाठी अमेरिकेच्या मिशिगन युनिवर्सिटी ऑलिम्पिक सेंटर मध्ये पाठवण्याचा आग्रह धरला. पदकाची शक्यता लक्षात घेऊन, भारतीय क्रीडा प्राधिकरणाने स्पेशल फंड बजरंगसाठी वापरुन त्याला तिथे पाठवलं.

अमेरिकेला का पाठवलं?

दुखापतीमधून सावरल्यानंतर सरावाच्यावेळी स्तरीय पार्टनरच्या कमतरतेनेही बजरंगच्या खेळावर परिणाम केला आहे. त्याला अमेरिकेला पाठवण्यामागे हे सुद्धा एक कारण होतं की, त्याला तिथे प्रॅक्टिससाठी त्याच्यापेक्षा मजबूत कुस्तीपटूचा सामना करावा लागेल. त्याला सूर गवसला आहे की, नाही यासाठी पहिल्या लढतीची प्रतिक्षा करावी लागेल.

बजरंग दुखापतीमधून सावरलाय का?

टोक्यो ऑलिम्पिकच्यावेळी बजरंग गुडघ्यांसाठी प्रोटेक्टिव टेप आणि नी कॅपचा वापर केला होता. टोक्या मधून परतल्यानंतर दुखापतीमधून सावरण्यासाठी त्याला सात महिने लागले. त्या दुखापीतनेही बजरंगचा खेळ प्रभावित केलाय. पूर्णपणे फिट झाल्यानंतरच बजरंगने कुस्तीचा सराव सुरु केला, असं सांगितलं जातय.