CWG 2022, Vinesh Phogat : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅट्ट्रीक, दीड मिनिटात विनेश फोगटनं घेतला सुवर्णपदकाचा ताबा

53 किलो वजनी गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत विनेश फोगटसमोर श्रीलंकेच्या चमोद्या केशानी मदुरावेलागेचे आव्हान होते. विनेशनं पहिल्याच प्रयत्नात प्रतिस्पर्धीला पाठीवर टेकवण्याचा डाव टाकून 4-0 अशी आघाडी घेतली. पुढे सविस्तर वाचा...

CWG 2022, Vinesh Phogat : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅट्ट्रीक, दीड मिनिटात विनेश फोगटनं घेतला सुवर्णपदकाचा ताबा
दीड मिनिटात विनेश फोगटनं घेतला सुवर्णपदकाचा ताबा Image Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 12:11 AM

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीड स्पर्धेत (CWG 2022) आज भारताच्या कुस्तीपटूंनी तीन सुवर्णपदक आणि एक रौप्य तसेच दोन कांस्यपदक जिंकून विक्रमी कामगिरी केली. 53 किलो वजनी गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत विनेश फोगटसमोर (Vinesh Phogat) श्रीलंकेच्या चमोद्या केशानी मदुरावेलागेचे आव्हान होते. विनेशनं पहिल्याच प्रयत्नात प्रतिस्पर्धीला पाठीवर टेकवण्याचा डाव टाकून 4-0 अशी आघाडी घेतली. चमोद्याला विनेशची पकड सोडवत आली नाही. ती पूर्णपणे हतबल दिसली, विनेशने दीड मिनिटांत सुवर्णपदक पटकावले. भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक (gold medals) जिंकले . तिने 53 किलो फ्रीस्टाइलमध्ये श्रीलंकेच्या चामोदय केशानीचा पराभव केला. विनेशने हा सामना 4-0 ने जिंकला. तिने 2014 ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये 48 किलो गटात आणि 2018 कॉमनवेल्थ गेम्समध्ये 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकले.

रवी दहियानेही सुवर्णपदक जिंकले

भारताचा स्टार कुस्तीपटू रवी कुमार दहिया याने राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच पदक जिंकले आहे. त्याचे पहिले पदक सुवर्ण आहे. रवीने फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत नायजेरियाच्या अबिकवेनिमो विल्सनचा 10-0 असा पराभव केला. कुस्तीतील भारताचे हे चौथे सुवर्णपदक आहे.

प्रथमच…

रवी हा चमत्कार करणारा पहिला पैलवान आहे. तो पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळला आणि अपेक्षेपलीकडे जाऊन देशाला रौप्यपदक मिळवून दिले. टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये रवी पदक जिंकेल असे कोणालाही वाटले नव्हते पण तो अंतिम फेरीत पोहोचला आणि रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी झाला. त्याचप्रमाणे तो प्रथमच राष्ट्रकुल खेळ खेळत होता आणि त्याच्या पहिल्याच खेळात तो सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरला होता. इथे मात्र त्याच्याकडून सुवर्णपदकाचीच आशा होती, जी त्याने पूर्ण केली. याशिवाय आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णपदके जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये त्याचे कांस्यपदक आहे. जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.