AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

800 किलोचा बैल थेट मैदानात घुसला अन् थैमान घालू लागला; खेळाडूंच्या छातीत धस्स झालं, जीव वाचवण्यासाठी पळापळ; इंग्लंडमधील Video Viral

क्रिकेटच्या मैदानानत अनेकदा अनेक आश्चर्यचकित करणारे प्रसंग घडत असताना. अनेकदा सामने रद्दही होतात, तसाच एक प्रसंग घडला मैदानात चक्क बैल घुसला आणि त्यानंतर जे घडलं त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

800 किलोचा बैल थेट मैदानात घुसला अन् थैमान घालू लागला; खेळाडूंच्या छातीत धस्स झालं, जीव वाचवण्यासाठी पळापळ; इंग्लंडमधील Video Viral
cricket ground
| Updated on: Jul 07, 2026 | 9:01 AM
Share

गेल्या काही वर्षांत क्रिकेटमध्ये अनेक व्यत्यय आले आहेत. पावसामुळे सामने थांबले आहेत, अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे सामने वेळेपूर्वीच संपवावे लागले आहेत. मधमाश्या, कुत्रे आणि अगदी सापांनीही खेळात अडथळा आणला आहे, पण इंग्लंडमधील नॉर्थ ईस्ट प्रीमियर लीगच्या एका सामन्यात अलीकडेच एक विशेष विचित्र घटना घडली, जेव्हा सुमारे 800 किलोग्रॅम वजनाचा एक बैल मैदानात घुसला आणि तिथून जायलाच तयार नव्हता. बर्नोपफील्ड क्रिकेट क्लब आणि हीटन लायन्स यांच्यातील लीग सामना बैल मैदानात घुसल्याने आणि वारंवार धावू लागल्याने थांबवावा लागला. ही एक मजेशीर पण धोकादायक परिस्थिती होती, ज्यामुळे खेळाडू, अधिकारी आणि प्रेक्षकांसाठी समस्या निर्माण होऊ शकल्या असत्या. एका अनोख्या प्रयत्नात, बैलाला दूर नेण्यासाठी एका गायीलाही आणण्यात आले, पण ही योजना अयशस्वी ठरली कारण घाबरलेला बैल मैदानात फिरतच राहिला.

बीबीसीच्या वृत्तानुसार, तो बैल जवळच्याच एका शेतातून पळून आला होता आणि क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने सुमारे 1.6 किलोमीटरचा प्रवास केला होता. स्थानिक शेतकरी आणि बैलाच्या मालकाने अनेक प्रयत्न करूनही, त्याला मैदानातून बाहेर काढता आले नाही. बैलाचा मालक घटनास्थळी पोहोचला आणि त्याने त्याला परत बोलावण्याचा प्रयत्न केला. बर्नोपफिल्ड क्लबचे संचालक मार्टिन ओसवेल यांनी स्पष्ट केले की, सुरुवातीला या घटनेचा सामन्यावर परिणाम होईल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. त्यांनी बीबीसीला सांगितले, “सुरुवातीला हे थोडे नवीन आणि गंमतीशीर वाटले, पण सामना रद्द होईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. आम्ही त्याला बाहेर काढू शकलो नाही आणि अंतिम मुदतीपूर्वी खेळ पुन्हा सुरू करणे शक्य नव्हते.”

जेव्हा बैलाला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका शेतकऱ्याला बैलाने धडक दिली, तेव्हा परिस्थिती अधिक गंभीर झाली. सुदैवाने, यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. ओसवेल पुढे म्हणाले, “बैल खूप घाबरला होता. दोन शेतकऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याने त्यापैकी एकाला धडक दिली. तो ठीक आहे, पण सुमारे 800 किलोग्रॅम वजनाचा हा प्राणी खूप चपळ, शक्तिशाली आणि धोकादायक होता.”

क्रिकेटमध्ये प्राण्यांचा हस्तक्षेप ही काही नवीन गोष्ट नाही, विशेषत: क्बल स्तरावर, कुत्रे अनेकदा मैदानात शिरतात, मधमाश्यांमुळे आंतरराष्ट्रीय सामने थांबले आहेत आणि सीमारेषेजवळ सापही दिसले आहेत. एकदा आफ्रिकन वाळवीच्या थव्याने मैदानावर हल्ला केला होता आणि इंग्लंडमध्ये गुरांनी खेळात व्यत्यय आणण्याची ही पहिली वेळ नाही, 2017 मध्ये केरिज आणि मॉसली यांच्यातील एका गावपातळीवर सामन्यादरम्यान, एक गाय मैदानात शिरली आणि खेळाडूंच्या दिशेने धावत गेली, त्यानंतर ती स्वत:हून निघू गेली. अखेरीस पोलिस घटनास्थळी पोहोचले, परंतु ती गाय स्वत: हून मैदानात निघून गेल्यामुळे कोणतीही कारवाई करण्याची गरज पडली नाही.

Follow Us
मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
Abhijeet Dipke : मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले,
Shivsena : गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले, आम्हाला गांभीर्याने....
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....