Video : लखनौकडून पंजाबला 154 धावांचे लक्ष्य, रबाडाने घेतल्या 4 विकेट, डी कॉकचं अर्धशतक हुकलं, पाहा Highlights Videos

पहिला झटका केएल काहुलचा बसला. त्यानंतर डी कॉक चांगला खेळला मात्र थोड्यावरुन त्याचं अर्धशतक हुकलं

Video : लखनौकडून पंजाबला 154 धावांचे लक्ष्य, रबाडाने घेतल्या 4 विकेट, डी कॉकचं अर्धशतक हुकलं, पाहा Highlights Videos
लखनौ संघ अव्वल स्थानी
Image Credit source: social
| Updated on: Apr 29, 2022 | 10:18 PM

मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघामध्ये सामना सुरू आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन येथे आयपीएलच्या 42 व्या सामन्यात पंजाबने टॉस जिंकलाय. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला सामना सुरू होण्यापूर्वी मोठा धक्का बसला. संघाचे सीईओ रघू अय्यर, त्यांची सहाय्यक रचिता बेरी आणि गौतम गंभीरचा व्यवस्थापक गौरव अरोरा यांचा कार अपघात झाला. वृत्त येताच संघा मैदानावर पोहचला होता. त्यानंतर त्यांनी सामना सुरू केला. या सामन्यात लखनौला पहिला झटका कर्णधारानेच दिला. कर्णधार केएल राहुल आऊट झालाय. त्याने 11 चेंडूत फक्त सहा धावा काढल्या आहेत. त्यात त्याने एक चौकार लगावलाय. राहुल रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र, दुसरं षटक राबडासाठी महाग ठरलं. डी कॉकने त्याच्या षटकात दोन षटकार लगावले. पहिल्या पॉवरप्लेमध्ये पंजाबच्या गोलंदाजांनी 39 धावा घेत केएल राहुलची मोठी विकेट घेतली होती.

केएल राहुलची विकेट. VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लखनौला पहिला झटका

डी कॉकचं अर्धशतक हुकलं

पहिला झटका केएल काहुलचा बसला. त्यानंतर डी कॉक चांगला खेळला मात्र थोड्यावरुन त्याचं अर्धशतक हुकलं. संदीप शर्माने जितेश शर्माच्या हाती डी कॉकला झेलबाद केलं. डी कॉकने बाद होण्याआधी 37 चेंडूत 46 धावा काढल्या.

डी कॉकची विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अखेर डॉ कॉक आऊट

हुडा 34 धावांवर धावबाद

दीपक हुडा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. पण, दुर्दैवाने तो धावबाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला दोन धावा घ्यायच्या होत्या पण जॉनी बेअरस्टोचा चेंडू सरळ नॉन स्ट्रायकरच्या टोकाला लागला आणि हुडा बाद झाला. त्याने बाद होण्यापूर्वी 28 चेंडूत 34 धावा केल्या.

हुड्डाची विकेट,  VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

…अन् हुड्डा बाद झाला

रबाडाने चार विकेट घेतल्या

लखनौ सुपर जायंट्सचा संघ चांगल्या भागीदारीनंतर थांबली. रबाडाने तिसऱ्या षटकात दोन मोठे धक्के दिले. त्याने षटकाच्या पहिल्या चेंडूवर क्रुणाल पांड्याला सात धावांवर बाद केले आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर आयुष बडोनीकडे धाव घेतली.

रबाडा जोरात

राहुल चहरचे दुहेरी यश

राहुल चहरने दोन षटकांत लखनौला दोन मोठे धक्के दिलेत्या. त्‍याने स्टोइनिसला तिसर्‍या षटकात बाद केलं. त्यानंतर पुढच्याच षटकात जेसन होल्डरला संदीपनं झेलबाद केलं.

पंजाबला 154 धावांचे लक्ष्य

लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जसमोर विजयासाठी 154 धावांचे लक्ष्य ठेवलंय. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौने 8 गडी गमावून 153 धावा केल्या. लखनौ संघाने शेवटच्या 55 धावांमध्ये 7 विकेट गमावल्या. लखनौकडून क्विंटन डी कॉकने 47 धावा केल्या. पंजाबकडून रबाडा आणि राहुल चहर यांनी मिळून 6 विकेट घेतल्या. रबाडाने 4 आणि चहरने दोन गडी बाद केले.