AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL लिलावात करोडोंची बोली आणि दुसऱ्याच दिवशी दुखापतग्रस्त, या टीमला झटका

IPL 2024 : आयपीएल 2024 लिलावाच्या दुसऱ्याच दिवशी एक खेळाडू दुखापतरग्रस्त झाला आहे. कालच आयपीएलच्या लिलावात या खेळाडूवलृर करोडो रुपयाची बोली लागली होती. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो दुखापतीमुळे बिग बॅशमध्ये खेळू शकला नाही. आता तो आयपीएलमध्ये खेळणार की नाही याकडे संघाचे लक्ष लागले आहे.

IPL लिलावात करोडोंची बोली आणि दुसऱ्याच दिवशी दुखापतग्रस्त, या टीमला झटका
IPL
| Updated on: Dec 20, 2023 | 5:36 PM
Share

IPL 2024 Update : IPL 2024 च्या लिलावात अनेक खेळाडू करोडपती झाले आहेत. अनेक खेळाडूंवर करोडोंची बोली लागली आहे. मंगळवारी आयपीएलचा लिलाव पार पडला आणि दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या एक खेळाडूला दुखापत झाली आहे. आयपीएल 2024 मध्ये आयपीएल संघांनी 72 खेळाडू खरेदी केले आहेत, ज्यासाठी सर्व 10 संघांनी एकूण 230 कोटी 45 लाख रुपये खर्च केले आहेत. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी लखनौ संघाला मोठा धक्का बसला आहे. लिलावात विकत घेतलेला एक खेळाडू जखमी झाला आहे. त्यामुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

कोण आहे तो खेळाडू ?

आयपीएल 2024 च्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ऍश्‍टन टर्नरला लखनौ सुपर जायंट्स संघाने 1 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. पण आयपीएल लिलावाच्या एका दिवसानंतर टर्नरला दुखापत झाली. यामुळे लखनौ संघाला मोठा धक्का बसला आहे. बिग बॅश लीगच्या सामन्यात होबार्ट हरिकेन्सविरुद्धच्या स्पेलचा पहिला चेंडू टाकल्यावर पर्थ स्कॉचर्सचा कर्णधार ऍश्‍टन टर्नर जखमी झाला. गोलंदाजी करताना त्याच्या उजव्या गुडघ्याला झालेली दुखापत वाढली. यानंतर तो मैदानाबाहेर गेला. गुडघ्याच्या या दुखापतीमुळे तो काही काळापासून त्रस्त होता. संध्याकाळी त्याची चाचणी होईल, त्यानंतर तो फलंदाजी करू शकेल की नाही हे कळू शकेल.

31 वर्षीय ऍश्‍टन टर्नर यापूर्वीही आयपीएलमध्ये खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून एकूण 4 सामने खेळले आहेत. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 192 धावा आणि 19 टी-20 सामन्यांमध्ये 110 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यात 2 आणि टी-20 सामन्यात 4 बळी घेतले आहेत.

IPL 2024 च्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने एकूण 6 खेळाडू खरेदी केले आहेत. शिवम मावीवर संघाने पैशांचा वर्षाव केला आहे. मावी व्यतिरिक्त लखनऊने एम सिद्धार्थ, डेव्हिड विली, ऍश्‍टन टर्नर, अर्शिन कुलकर्णी आणि अर्शद खान यांना विकत घेतले आहे.

IPL 2024 नंतर लखनौ सुपर जायंट्स संघ:

केएल राहुल, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, दीपक हुडा, के गौतम, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, प्रेराक मंकड, युधवीर सिंग, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, रवी बिश्नोई, यश ठाकूर, ए. मिश्रा, नवीन-उल-हक, शिवम मावी, एम सिद्धार्थ, डेव्हिड विली, ऍश्‍टन टर्नर, अर्शिन कुलकर्णी, अर्शद खान आणि देवदत्त पडिक्कल.

राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?.
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले...
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले....
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.