Ranji Trophy: विराट कोहली याच्या सुरक्षेत मोठी घोडचूक, नक्की काय झालं? पाहा व्हीडीओ

Virat Kohli Railways vs Delhi : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि दिल्लीकर विराट कोहली तब्बल 1 दशकानंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळतोय. विराटने रेल्वे विरूद्धच्या सामन्यातून कमबॅक केलं. मात्र या सामन्यात विराटच्या सुरक्षेशी खेळ झाल्याचं समोर आलं. पाहा व्हीडियो.

Ranji Trophy: विराट कोहली याच्या सुरक्षेत मोठी घोडचूक, नक्की काय झालं? पाहा व्हीडीओ
virat kohli ranji trophy
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 30, 2025 | 1:56 PM

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील दुसऱ्या टप्प्याचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत आज 30 जानेवारीला अनेक सामने खेळवण्यात येत आहेत. मात्र साऱ्यांचं लक्ष हे विराट कोहलीकडे आहे. विराटने दिल्ली टीमकडू तब्बल 13 वर्षांनंतर रेल्वेविरूद्धच्या सामन्यातून देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. विराट खेळणार असल्याने या सामन्याला महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे हा सामना टीव्हीवर लाईव्ह दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोफत एन्ट्री मिळणार असल्याने तोबा गर्दी पाहायला मिळाली. मात्र या सामन्यात विराट आणि इतर खेळाडूंच्याही सुरक्षेबाबत चूक झाल्याचं समोर आलं.

आता विराट इतक्या वर्षांनी दिल्लीसाठी आणि तेही दिल्लीत खेळतोय म्हटल्यावर दिल्लीकरांनी स्टेडियमध्ये गर्दी केली असती तरच नवल. त्यात फ्री एन्ट्री, म्हणजे विषयच संपला. ही माणस मॅच बघायला. त्यात एक अतिउत्साही चाहता. सुरक्षा रक्षकांना चकवा देत गडी घुसला मैदानात आणि विराटच्या दिशेने धावत गेला. चाहत्याने विराटच्या पायाला स्पर्श केला. मात्र त्यामागून सुरक्षा रक्षकही धावत आले. त्या चाहत्याला विराटपासून दूर केलं आणि खेचत खेचत मैदानातून घेऊन गेले. मात्र त्या चाहत्याला काही न करता सोडून द्या, असं विराटने सुरक्षारक्षकांना इशाऱ्याने सांगितलं आणि उपस्थितांची मनं जिंकली. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विराटच्या बॅटिंगची प्रतिक्षा

दरम्यान विराटला गेल्या काही सामन्यांमध्ये त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे विराटकडून आता क्रिकेट चाहत्यांना या रणजी ट्रॉफीत मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. विराट चौथ्या स्थानी बॅटिंगला येणार आहे. त्यामुळे विराटकडून असंख्य चाहत्यांना मोठी खेळी अपेक्षित आहे. आता विराट मोठी खेळी करतो की आणखी काही होतं? याकडे साऱ्यांचंच लक्ष असेल.

“सोडा त्याला, जाऊ द्या”

रेल्वे प्लेइंग ईलेव्हन : सूरज आहुजा (कर्णधार), अंचित यादव, विवेक सिंग, उपेंद्र यादव (विकेटकीपर), मोहम्मद सैफ, भार्गव मेराई, कर्ण शर्मा, राहुल शर्मा, हिमांशू सांगवान, अयान चौधरी आणि कुणाल यादव.

दिल्ली प्लेइंग इलेव्हन : आयुष बडोनी (कर्णधार), अर्पित राणा, सनत सांगवान, विराट कोहली, यश धुल, प्रणव राजुवंशी (विकेटकीपर), सुमित माथूर, शिवम शर्मा, नवदीप सैनी, मनी ग्रेवाल आणि सिद्धांत शर्मा.