Virat Kohli : कोहलीसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने मुंबईत विक्री केले कपडे आणि शूज, क्रिकेटरने दिली अशी प्रतिक्रिया..

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

Updated on: Nov 26, 2022 | 6:28 PM

Virat Kohli : भाऊ डिक्टो कोहलीसारखा दिसतो, कोहलीनेच त्याच्या इन्स्टाग्रामवरुन दिली ही माहिती..

Virat Kohli : कोहलीसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने मुंबईत विक्री केले कपडे आणि शूज, क्रिकेटरने दिली अशी प्रतिक्रिया..
भाऊचा अंदाजच वेगळा
Image Credit source: सोशल मीडिया

मुंबई : भारतीय तडाखेबंद फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर क्रिकेट जगतातून (Cricket World) आण फॅन्सकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. हुबेहुब विराट कोहलीसारखा दिसणारा एक व्यक्ती या व्हिडिओत दिसतोय आणि त्यानंतर जे घडतं त्यावरुन अनेकांना आश्चर्य तर वाटतंच, पण विराटच्या दिलदारपणाचं दर्शन तर होतंच पण ती व्यक्तीही लोकांचे मनं जिंकते..

Virat Kohli याने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. कोहली सध्या टी20 विश्वचषकानंतर सुट्टी घालवत आहे. या व्हिडिओत हुबेहुब विराट सारखा दिसणारी व्यक्ती मुंबईच्या रस्त्यावर शूज आणि कपडे विक्री करताना दिसते.

ही व्यक्ती मुंबईच्या एका रस्त्यावर प्यूमा ब्रँडचे शूज आणि कपडे विक्री करताना दिसते. हा व्हिडिओ काही क्षणातच ट्रेंड झाला. क्रिकेटप्रेमी आणि विराट प्रेमींनी त्यावर दणादण प्रतिक्रियांचा पाऊस पाडला.

‘हे प्यूमा इंडिया, कोणती तरी व्यक्ती माझी नकल करत आहे. ही व्यक्ती मुंबईच्या लिंकिंग रस्त्यावर प्यूमाचे उत्पादनं विक्री करत आहे. काय तुम्ही इकडं लक्ष द्यायल का?’ असं मजेशीर कॅप्शन लिहित विराटने व्हिडिओ शेअर केला आहे.

डिक्टो विराट सारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीसोबत अनेकांनी सेल्फीची हौस भागवून घेतली. ही व्यक्ती हुबेहुब विराट सारखी दिसते. तिने भारतीय किक्रेट संघाची जर्सीही घातलेली दिसते. या जर्सीवर प्यूमा असे लिहिलेले आहे.

भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. विराट कोहली सह अनेक ज्येष्ठ खेळाडू या दौऱ्यात सहभागी झालेले नाहीत. कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत उत्तराखंड येथे गेला होता.

या दौऱ्यात विराट कुमाऊंच्या कैंची येथील प्रसिद्ध नीम करोली बाबांच्या दर्शनाला गेला होता. या बाबांचे जागतिक किर्तीचे असंख्य भक्त आहेत. याठिकाणी अनेकांनी विराट कोहलीसोबत सेल्फीही घेतली.

4 डिसेंबरपासून बांग्लादेशाविरोधातील कसोटी सामन्यात विराट कोहलीची तडाखेबंद फलदाजी आपल्याला पहायला मिळेल. विराट मोठ्या ब्रेकनंतर या कसोटी मालिकेत खेळताना दिसेल. विराटने त्याचा शेवटचा सामना इंग्लंड विरोधात जुलै महिन्यात खेळला होता.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI