पाकिस्तानमध्ये हॉटेल रूमबाहेर बंदुका… बांगलादेशाच्या कर्णधाराने सांगितला थरार… मग भारतात खेळण्यास कुणाची बंदी? लिटन दास म्हणाला काय?
Bangladesh Captain Litton Das: बांग्लादेश टी20 चा कर्णधार लिटन दास याने पाकिस्तानमध्ये खेळताना आलेला थरारक अनुभव सांगितला. त्याने तिथे झालेल्या वादावरही मोठा खुलासा केला आहे.

Bangladesh Captain Litton Das: बांगलादेसाचा टी20 कर्णधार लिटन दास याने 2026 मध्ये टी20 विश्वचषकात त्याच्या संघाच्या अनुपस्थितीविषयी मोठा खुलासा केला. एका मुलाखतीत लिटन यांनी त्यावेळच्या वादाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. खेळाडूंना भारतात खेळायचे होते. पण हा निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार त्यांच्याकडे नव्हते असे लिटन दास म्हणाला. खेळाडू आणि अधिकाऱ्यांची एक बैठक झाली होती. भारतात खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला होता. पण खेळाडू यांना तसे वाटत नव्हते. बांगलादेशाचा संघ यापूर्वी पाकिस्तानात खेळली आहे. हॉटेलच्या रुमबाहेर त्यावेळी बंदुका असत अथवा सुरक्षा रक्षक तैनात असत. त्यामुळे भारतात खेळताना सुरक्षेचा इतका का बाऊ करण्यात आला हे कळत नाही, असे दास म्हणाला.
पाकिस्तानपेक्षा भारत अधिक सुरक्षित
व्यवस्थापनाने आम्हाला सांगितले की, भारतात सुरक्षा नाही. त्यावेळी खेळाडूंनी तर्क दिला. पाकिस्तानमध्ये हॉटेलच्या रुमबाहेर बंदुकधारी सुरक्षा रक्षक तैनात होते. त्खेळाडूंच्या जीवाला हा तर सर्वात मोठा धोका होता. जर आम्ही पाकिस्तानमध्ये खेळू शकतो तर मग भारतात का नाही, असा सवाल खेळाडूंनी व्यवस्थापनाला विचारला होता, असे लिटन दास याने सांगितले.
बांगलादेशातील राजकीय स्थितीवर मोठे भाष्य
मुलाखतीत लिटन दासला क्रिकेट आणि बांगलादेशातील राजकारण याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. खेळाडू भारतात टी20 विश्वचषक खेळू इच्छित नव्हते का? असा सवाल विचारला गेला. तेव्हा लिटन दासने हुशारीने उत्तर दिले. सत्ता असताना आणि कोणी सत्तेत नसताना वक्तव्य बदलतात, असे खास उत्तर त्याने दिले. त्यामुळे बांगलादेशातील काळजीवाहू मोहम्मद युनूस सरकार आणि तिच्या धोरणावर हे मोठे भाष्य मानले जात आहे.
युनूस सरकारच्या काळात भारताविरोधात अधिक गरळ ओकण्यात आली होती. युनूस हे भारतविरोधी गोटातील मानले जातात. विद्यार्थी आंदोलनाचा बाऊ करून शेख हसीना यांचे सरकार उलथवण्यात आले. त्यामागे अमेरिका होता की चीन यावरून वाद सुरू असला तरी या सत्ता पालटामुळे बांगलादेशाचा जीडीपी मोठ्या प्रमाणात घसरला. कट्टरतावाद्यांनी देशाचे मोठा आर्थिकच नाही तर सामाजिक नुकसान केले. हिंदूंना टार्गेट करण्यात आले. विरोधी पक्ष नेत्यांना ठार करण्यात आले. त्यांची घरं जाळण्यात आली. टार्गेट किलिंगचे सत्र या काळात बांगलादेशमध्ये सुरू होते. आता निवडणुकीनंतर नवीन सरकार अस्तित्वात आले आहे. तरीही बांगलादेशाचे भारताशी संबंध अजून ही पूर्वपदावर आलेले नाहीत.