T20 World Cup, ENG vs NZ सामन्यात कोणाचं पारडं जड, काय लागेल निकाल? आकाश चोप्राची भविष्यवाणी

| Updated on: Nov 10, 2021 | 1:36 PM

ICC T20 विश्वचषक-2021 स्पर्धेमध्ये आज अबुधाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंड-न्यूझीलंड संघ आमनेसामने असतील. हे दोन संघ एकदिवसीय विश्वचषक-2019 च्या अंतिम फेरीत भिडले होते.

T20 World Cup, ENG vs NZ सामन्यात कोणाचं पारडं जड, काय लागेल निकाल? आकाश चोप्राची भविष्यवाणी
ENG vs NZ
Follow us on

मुंबई : ICC T20 विश्वचषक-2021 स्पर्धेमध्ये आज अबुधाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंड-न्यूझीलंड संघ आमनेसामने असतील. हे दोन संघ एकदिवसीय विश्वचषक-2019 च्या अंतिम फेरीत भिडले होते. तो सामना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्यांमध्ये गणला जातो. अंतिम फेरीत इंग्लंडने न्यूझीलंडला अधिक बाऊंड्रीज मारल्यामुळे पराभूत केले होते. आता न्यूझीलंडला या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. पण भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राला या सामन्यात न्यूझीलंड जिंकेल असे वाटत नाही. या सामन्यात इंग्लंडचे पारडे जड आहे असे त्याला वाटते. (Aakash chopra says england can dominate new zealand in first Semifinal of t20 worldcup 2021)

या सामन्यावर इंग्लंडच्या सलामीच्या जोडीचा अधिक प्रभाव पडेल, असे आकाशने म्हटले आहे. आकाशने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “इंग्लंडचे सलामीवीर न्यूझीलंडच्या सलामीवीरांपेक्षा जास्त धावा करतील. जॉस बटलरसोबत कोण सलामीला उतरेल? या प्रश्नावर तो म्हणाला की, मला वाटते की जॉनी बेअरस्टो सलामीला उतरेल. डेव्हिड मलान देखील सलामीवीर म्हणून मैदानात उतरू शकतो. लियाम लिव्हिंगस्टोनही वरच्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्याच वेळी, न्यूझीलंड संघात डार्ली मिशेल आहे आणि तो मार्टिन गप्टिलसह डावाची सुरुवात करेल. दोघांनीही आतापर्यंत एकेक चांगली खेळी खेळली आहे. या बाबतीत मी इंग्लंडच्या बाजूने आहे.

इंग्लंडचे फलंदाज अधिक चौकार मारतील

या सामन्यात इंग्लंडचे फलंदाज न्यूझीलंडच्या फलंदाजांपेक्षा जास्त चौकार मारतील असेही आकाशने म्हटले आहे. आकाश म्हणाला, “इंग्लंडचे खेळाडू अधिक चौकार आणि षटकार मारतील. या सामन्याचा निकाल चौकार-षटकारांच्या संख्येवर असेल म्हणून नाही, तर एकंदरीत इंग्लंडचे फलंदाज आतापर्यंत अधिक प्रभावी वाटले आहेत. येथे तुमच्याकडे सुपर ओव्हर्सवर सुपर ओव्हर्स असतील. परंतु सामना सुपर ओव्हरपर्यंत जाणार नाही. पण मला वाटते की इंग्लंडचे फलंदाज अधिक चौकार मारतील.

असा आहे दोन्ही संघांचा प्रवास

इंग्लंड संघाने सुपर-12 मध्ये पाचपैकी चार सामने जिंकले होते. त्यांचा एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेकडून झाला. इंग्लंडने ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि बांग्लादेशचा पराभव केला. ग्रुप 1 मध्ये पहिले स्थान मिळवून इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. सुरुवातीपासूनच हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा विचार केला तर, पहिल्या सामन्यात या संघाला पाकिस्तानने पराभूत केले होते, परंतु नंतर केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील या संघाने भारताचा पराभव केला आणि नंतर अफगाणिस्तानला पराभूत करून अंतिम-4 मध्ये आपले स्थान निश्चित केले.

इतर बातम्या

टीम इंडियात उभी फूट, विराट कोहली लवकरच संन्यास घेणार; दिग्गज पाकिस्तानी खेळाडूचं भाकित

India vs New Zealand: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, 3 खेळाडू करणार टीम इंडियामधून डेब्यू, आयपीएलमधील कामगिरीनंतर BCCI कडून संधी

T20 World Cup मधील प्रदर्शनानंतर दिनेश कार्तिकने निवडली त्याची प्लेयिंग 11, बाबर आजम कर्णधार, रोहित-विराट बाहेर

(Aakash chopra says england can dominate new zealand in first Semifinal of t20 worldcup 2021)