AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड कप सुरू असताना एबी डिव्हिलियर्सकडून मुंबईमध्ये युवा खेळाडूंना क्रिकेटचे धडे

Ab De villiers in Mumbai Shivaji Park : वर्ल्ड क्रिकेटमध्ये मिस्टर 360 म्हणून प्रसिद्ध असलेला एबी डिव्हिलियर्स मुंबईमध्ये युवा खेळाडूंना क्रिकेट धडे देताना दिसला. एबीचे सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

वर्ल्ड कप सुरू असताना एबी डिव्हिलियर्सकडून मुंबईमध्ये युवा खेळाडूंना क्रिकेटचे धडे
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Nov 03, 2023 | 7:24 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 सूरू असून यंदा टीम इंडिया वर्ल्ड कपवर नाव कोरणारा असल्याचं दिसत आहे. भारताने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नसून आता सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. देशभर वर्ल्ड कप सुरू असताना मिस्टर 360 म्हणून जगभरात आपली ओळख केलेला एबी डिव्हिलियर्सही भारतात आहे. एबीने मुंबईतील अंडर 19 खेळाडूंचा सामना पाहिला आणि त्यांची भेट घेत संवाद साधला.

ऑल हार्ट क्रिकेट अकादमीद्वारा संचालित माहीममध्ये किशोर एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 2023-24 चे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमासाठी प्रमुखस पाहुणा म्हणून दिनेश कार्तिक याला बोलावलं होतं. एमसीएचे सचिवअजिंक्य नाईक आणि जे.टी. सचिव दीपक पाटील यांच्यासह सर्वोच्च परिषद सदस्य अभय हडप आणि कौशिक गोडबोले उपस्थित होते. या अंडर 19 संघाला भेट देणाऱ्या खेळाडूंमध्ये दिनेश कार्तिक, एबी डिव्हिलियर्स, व्यंकटेश अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, राहुल त्रिपाठी यांचा समावेश होता.

उद्घाटन समारंभाची सुरुवात दिनेश कार्तिक यांच्या प्रस्तावनेने आणि प्रेरणादायी संबोधनाने झाली. या स्पर्धेचे आयोजन प्रशिक्षक अभिषेक नायर आणि संघाने एमसीएच्या मदतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अजिंक्य नाईक आणि कार्तिक यांच्या हस्ते विजेत्या ट्रॉफीचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर नाईक यांनीही नवोदित क्रिकेटपटूंशी संवाद साधला. यावेळी एबी डिव्हिलियर्सने शिवाजी पार्कला भेट दिली आणि मुंबई क्रिकेट आणि स्पर्धेबाबतची माहिती घेतली.

दरम्यान, एबीने खेळाडूंशी संवाद साधत मार्गदर्शन केलं, नव्या दमाच्या खेळाडूंनीही जगभर दहशत केलेल्या या स्टार खेळाडूने दिलेले क्रिकेटचे धडे शिकून घेतले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ्या विक्रमांना एबीने गवसणी घातली आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!