अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांची डोप टेस्ट होणार! ठावठिकाणाची माहिती द्यावी लागणार

आयपीएल 2026 स्पर्धा आता रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे. असं असताना टी20 वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडू अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांची डोप टेस्ट होणार आहे. त्यासाठी कुठे असतील त्याचा पत्ता नाडाला द्यावा लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जाईल.

अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांची डोप टेस्ट होणार! ठावठिकाणाची माहिती द्यावी लागणार
अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांची डोप टेस्ट होणार! कुठे त्या ठावठिकाणाची माहिती द्यावी लागणार
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 15, 2026 | 4:32 PM

राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) 2026 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी आरटीपी यादी जाहीर केली आहे. या नवीन यादीत 348 खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघाचा ओपनर अभिषेक शर्मा आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांची डोप टेस्ट होणार आहे. NADAने या दोघांचं नाव डोप टेस्ट यादीत समाविष्ट केलं आहे. त्यामुळे या खेळाडूंना आपल्या ठावठिकाण्याची माहिती देणं भाग असणार आहे. पण त्यांनी असं करण्यास तीन वेळा टाळाटाळ केली तर उत्तेजक द्रव्य सेवनाचे उल्लंघन केल्याचं मानलं जाईल. स्मृती मंधाना आणि श्रेयस अय्यर यांच्या जागी अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांना सहभागी केलं आहे. या खेळाडूंना एक ठरावीक वेळेआधी टेस्टसाठी उपस्थित राहावं लागणार आहे. अभिषेक, अक्षरसह कसोटी आणि वनडे कर्णधार शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, केएल राहुल, अर्शदीप सिंह आणि तिलक वर्मा यांचीही चाचणी केली जाणार आहे.

महिला वनडे वर्ल्डकप विजेत्या संघातील अष्टपैलू दीप्ति शर्मा, शफाली वर्मा, रेणुका सिंह ठाकुर यांचाही या यादीत समावेश आहे. नाडाने आपल्या यादीत 14 क्रिकेटपटूंचा समावेश केला आहे. इतकंच काय तर नाडाच्या यादीत 134 एथलीट्सचा समावेश आहे. मागच्या वर्षी ही संख्या 118 होती. यात स्टीपलचेजर अविनाश साबले, हर्डलर ज्योती याराजी, डेकाथलॉन खेळाडू तेजस्विनी शंकर आणि स्प्रिंटर अनिमेष कुजुर यांची नावं आहेत.लांब उडी स्पर्धेत भाग घेतलेली शैली सिंह आणि एम श्रीसंकर, थाळी फेकपटून तजिंदरपाल सिंह यांचाही या यादीत समावेश आहे. अनुभवी खेळाडू दीपिका कुमार, राकेश कुमार आणि शीतल देवी यांचीही टेस्ट होणार आहे.

हॉकी स्टार मनप्रीत सिंह, कर्णधार हरमनप्रीत सिंह, अमि रोहिदास आणि हार्दिक सिंह यांच्यासह महिला हॉकी संघाची कर्णधार सलीमा टेटे, सविता पुनिया आणि नवनीत कौर यांचाही समावेश आहे. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधु, लक्ष्य सेन, गायत्री गोपिचंद आणि अन्य खेळाडू या यादीत आहेत. या यादीत 22 बॉक्सर असून वर्ल्ड चॅम्पियन्स निकहत जरीन, निशांत देव आणि जॅस्मीन लँबरिया आणि ऑलिम्पिक कास्य पदक विजेत्या लवलीना बोरगोहेन यांचा समावेश आहे. खेळाडूंनी कार्यक्षमता वाढवणारी प्रतिबंधित औषधे घेतली आहेत की नाही, याची तपासणी केली जाते. या चाचणीत लघवी किंवा रक्ताचे नमुने घेऊन औषधांचे सेवन तपासले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us