
भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की शाब्दिक चकमक होणार यात काही शंका नाही. पण यावेळची स्थिती काही वेगळी आहे. भारतीय खेळाडूंच्या मनात पहलगाम हल्ल्याची सळ आहे. त्यामुळे पाकिस्तानचा चेंदामेंदा करण्याची एकही संधी सोडली नाही. साखळी फेरीनंतर भारतीय खेळाडूंनी सुपर 4 फेरीत पाकिस्तानचे कपडे काढले. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी पाकिस्तानला पहिल्या चेंडूपासून दणका दिला. पाकिस्तानचा स्टार गोलंदाज म्हणून ख्याती असलेल्या शाहीन शाह आफ्रिदीला पहिल्या चेंडूवर षटकार मारला. अभिषेक शर्माने तर त्याला अक्षरश: सोलून काढला. त्यामुळे शाहीन शाह आफ्रिदी आपला राग वारंवार व्यक्त करत होता. नेमकं या सामन्यात काय झालं ते जाणून घ्या
पाकिस्तानने 172 धावांचं दिलेलं आव्हान गाठण्यासाठी अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल जोडी मैदानात आली. पहिल्याच चेंडू शाहीनने बाउंसर टाकला. अभिषेकने त्या संधीचं सोनं करत पुल शॉट मारत बाउंड्री पार पोहोचवला. शाहीनची ख्याती पहिल्या षटकात विकेट घेण्याची आहे. पण त्याला षटकार मारत बॅकफूटवर ढकलला. अभिषेक शर्माच्या आक्रमक शैलीमुळे शाहीन आफ्रिदी बावचळला. पुढच्या षटकात त्याने गिलवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्याने चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारला. यावेळी शाहीन रागाच्या भरात काहीतरी पुटपुटत होता. तेव्हा त्याने बाउंड्री दाखवत चेंडूत तिथे पोहोचवला आहे असा इशारा दिला.
Classic Abhishek Sharma 💥
Watch #INDvPAK LIVE NOW, on the Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 pic.twitter.com/hORYGOrpgS
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 21, 2025
Shubman Gill 🔥after smoking Shaheen for 4:
Shot bhi lagaya, izzat bhi utari’ 🤡🔥”Abhishek Sharma | Shivam dube | #PAKvIND #PakistanCricket pic.twitter.com/Tx3vqfwK2x
— Harsh Vardhan (@harshvard100710) September 21, 2025
🚨 Abhishek Sharma: The way Pakistani players were coming at us without any reason I didn’t like it and I responded with my bat
Bro cooked Pakistan again 😭 pic.twitter.com/NB90sbQaha
— ADITYA 🇮🇹 (@Wxtreme10) September 21, 2025
अभिषेक शर्मा आणि हारिस रउफ यांच्यातही शाब्दिक चकमक झाली. तेव्हा अभिषेक शर्माने त्याला जसाच तसं उत्तर दिलं. सामन्यानंतर त्याने या प्रसंगावर आपलं मत व्यक्त केलं. ‘आजचा दिवस खूपच सोपा होता, ते ज्या पद्धतीने आमच्याकडे कोणत्याही कारणाशिवाय येत होते, ते मला अजिबात आवडले नाही. म्हणूनच मी त्यांच्या मागे गेलो. मला संघासाठी कामगिरी करायची होती.’, असं उत्तर अभिषेक शर्माने सामन्यानंतर दिले. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पॉवर प्लेमध्ये केलेल्या आक्रमक खेळीमुळे पाकिस्तान तिथेच नांगी टाकून दिली होती.