
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत अभिषेक शर्माचा झंझावात सुरुच आहे. पंजाब संघाची धुरा हाती असून आक्रमक खेळी करताना मागे पुढे पाहात नाही. पंजाब विरुद्ध सर्विसेज सामन्यात अभिषेक शर्मान आक्रमक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सर्विसेजने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. अभिषेक शर्मा हा प्रभसिमरन सिंह सलामीला आला. खेळपट्टीवर तग धरत नाही तोच अभिषेक शर्माने आक्रमक बाणा दाखवला. समोर जो गोलंदाज येईल त्याच्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केली. प्रभसिमरन सिंह 28 चेंडूत 50 दावा करून बाद झाला. तर अभिषेक शर्माने 34 चेंडूत 62 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 3 षटकार आणि 8 चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट हा 182.35 चा होता. तीन षटकारांसह अभिषेक शर्मा सिक्सर किंग ठरला आहे.
अभिषेक शर्माने सर्विसेजच्या पाच गोलंदाजांचा सामना केला. या पाचही गोलंदाजांना त्याने आक्रमक खेळी केली. विशाल गौरला 7 चेंडू 12, एसएम राठीला 4 चेंडूत 8, अभिषेकला 8 चेंडूत 16, पुलकित नारंगला 12 चेंडूत 22 आणि रवि चौहानला 3 चेंडूत 5 धावा मारल्या. अभिषेक शर्माने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक षटकारांची नोंद केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात त्याने सर्वाधिक 26 षटकार मारले आहे. आयुष म्हात्रे 25 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर सर्वाधिक धावांच्या यादीत अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे.
अभिषेक शर्माने सहा सामन्यात 26 षटकारांसह 304 धावा केल्या आहेत. तर आयुष म्हात्रेने 6 सामन्यात 325 धावा केल्या आहेत. या पर्वात अभिषेक शर्माची सर्वोत्तम धावसंख्या ही 148 आहे. अभिषेक शर्माचा फॉर्म भारतीय संघासाठी दिलासादायक बाब आहे. कारण दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पाच सामन्याची टी20 मालिका 9 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत अभिषेक शर्मा संघाचा भाग आहे. तर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या दृष्टीने त्याचा फॉर्म महत्त्वाचा ठरणार आहे.
पंजाबने 20 षटकात 6 गडी गमवून 233 धावा केल्या आहेत आणि विजयासाठी 234 धावांचं आव्हान दिलं आहे. अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंह यांच्या व्यतिरिक्त नमन धीर याने आक्रमक खेळी करत अर्धशतक ठोकलं. त्याने 22 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकार मारत 54 धावा केल्या