AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND : 8 बॉलमध्ये 42 धावा, दक्षिण आफ्रिकेला झोडला, सूर्याचा विश्वास सार्थ ठरवला, अभिषेक शर्माचा अर्धशतकी झंझावात

Abhishek Sharma Fifty : गेल्या काही डावात सातत्याने अपयशी ठरणाऱ्या अभिषेक शर्मा याला अखेर सूर गवसला आणि त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना झोडून काढत अर्धशतक केलंय.

SA vs IND : 8 बॉलमध्ये 42 धावा, दक्षिण आफ्रिकेला झोडला, सूर्याचा विश्वास सार्थ ठरवला, अभिषेक शर्माचा अर्धशतकी झंझावात
Abhishek Sharma battingImage Credit source: Bcci x Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Nov 13, 2024 | 10:01 PM
Share

टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा गेल्या काही टी 20I सामन्यांमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत होता. अभिषेकला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे अभिषेकला तिसर्‍या टी 20I सामन्यातून बाहेर करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र कॅप्टन सूर्यकुमार यादव याने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये कायम ठेवलं. अभिषेकने सूर्याचा विश्वास सार्थ ठरवला आणि दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करत अर्धशतक झळकावलं.

टीम इंडियाने दुसऱ्या बॉलवर पहिली विकेट गमावली. संजू सॅमसन झिरोवर आऊट झाला. त्यानंतर अभिषेक शर्माची साथ द्यायला तिलक वर्मा आला. या दोघांनी दोन्ही बाजूने जोरदार फटकेबाजी केली. अभिषेक शर्माने टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत चौफेर फटकेबाजी केली. दोघांनीही पावर प्लेचा पूर्ण फायदा उचलला आणि 70 धावा जोडल्या. पावरप्लेनंतरही दोघांनी अशीच फटकेबाजी सुरु ठेवली.

अभिषेकने नवव्या ओव्हरमधील दुसर्‍या बॉलवर केशव महाराज याच्या बॉलवर एकेरी धाव घेत अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेकने 208.33 च्या स्ट्राईक रेटने 24 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेकने या खेळीत 5 षटकार आणि 3 चौकार ठोकले. याचाच अर्थ अभिषेकने 8 चेंडूत 52 धावा केल्या. मात्र अभिषेक 25 व्या बॉलवर आऊट झाला. मात्र अभिषेकचा या अर्धशतकी खेळीमुळे विश्वास वाढला असेल, हे मात्र नक्की.

अभिषेक शर्माची विस्फोटक बॅटिंग

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...