AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6… वैभव सूर्यवंशीने अवघ्या 32 चेंडूत 300हून अधिकच्या स्ट्राईक रेटने ठोकलं शतक

एसीसी मेन्स आशिया कप स्पर्धेत वैभव सूर्यवंशीचा झंझावात पाहायला मिळाला. वैभव सूर्यवंशीने शतकी खेळी केली. पण यावेळी त्याचा स्ट्राईक 300 हून अधिकचा होता. अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकलं.

6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6... वैभव सूर्यवंशीने अवघ्या 32 चेंडूत 300हून अधिकच्या स्ट्राईक रेटने ठोकलं शतक
6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6... वैभव सूर्यवंशीने अवघ्या 32 चेंडूत 300हून अधिकच्या स्ट्राईक रेटने ठोकलं शतकImage Credit source: PTI
| Updated on: Nov 14, 2025 | 5:52 PM
Share

एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि युएई यांच्याता सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  टीम इंडियाचा हा निर्णय योग्यच होता असं म्हणावं लागेल. कारण वैभव सूर्यवंशीने आक्रमक खेळी करत प्रतिस्पर्धी संघाचं कंबरडं मोडलं. वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्य ही जोडी सलामीला मैदानात उतरली. पण अवघ्या 16 धावांवर असताना प्रियांश आर्य धावचीत होत तंबूत परतला. त्याने 6 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार मारत 10 धावा केल्या होत्या. प्रियांश बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीचा झंझावात काही थांबला नाही. त्याने आपल्या शैलीप्रमाणे गोलंदाजांना झोडून काढलं. समोर येईल त्या गोलंदाजाला फोडलं. वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत 10 चौकार आणि 9 षटकार मारत 318.75 च्या स्ट्राईक रेटने शतक ठोकलं.

वैभव सूर्यवंशीने अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्याने 305.88 च्या स्ट्राईक रेटने या धावा काढल्या. यात त्याने 6 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार मारले होते. वैभवने पुढच्या 50 धावा या अवघ्या 15 चेंडूत केल्या आणि शतक पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशीने आपला फॉर्म दाखवून दिला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स काय त्याला रिलीज करत नाही. उलट त्याच्याकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत. वैभव सूर्यवंशी गेल्या काही सामन्यांपासून आपल्या फलंदाजीची धार दाखवून देत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी टीम इंडियाचं दार लवकरच खुलं होणार असं दिसत आहे.

वैभव सूर्यवंशीला नमन धीरची चांगली साथ मिळाली. नमन धीर देखील 150हून अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा काढत होता. त्यामुळे युएईचे गोलंदाज पुरते हैराण झाले होते. या जोडीमुळे भारताच्या पॉवर प्लेमध्ये 82 धावा झाल्या. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 100हून अधिक धावांची भागीदारी केली. दरम्यान, भारताचा या स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीचा आक्रमक पवित्रा पुन्हा एकदा पाहता येणार आहे. 16 नोव्हेंबरला रविवारी हा सामना होणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...