वयाने 11 वर्ष लहान या व्यक्तीला डेट करतेय अभिनेत्री क्रिती सेनन, इतक्या कोटींचा आहे मालक

अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या नव्या क्रू या सिनेमामुळे सध्या चर्चेत आहे. या सिनेमात तिने अभिनेत्री तब्बू आणि करिना कपूर यांच्यासोबत काम केले आहे. पण क्रिती सेनन ही तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे देखील चर्चेत आहे. कोणाला डेट करतेय क्रिती जाणून घ्या.

वयाने 11 वर्ष लहान या व्यक्तीला डेट करतेय अभिनेत्री क्रिती सेनन, इतक्या कोटींचा आहे मालक
| Updated on: Apr 01, 2024 | 5:45 PM

क्रिती सेनन सध्या तिच्या क्रू या सिनेमामुळे चर्चेत आहेत. तिचं बॉलिवूडमधील करिअर देखील व्यवस्थित सुरुये. ‘क्रू’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या सिनेमाला लोकांची पसंती मिळत असून तिन्ही अभिनेत्रींच्या भूमिकेचं कौतूक होत आहे. या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. पण या व्यतिरिक्त अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. क्रिती ही यूकेमध्ये राहणाऱ्या कबीर बहियाला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. तिने होळीच्या दिवशी एक फोटो पोस्ट केला, ज्यानंतर सोशल मीडियावर तो तिचा बॉलफ्रेंड असल्याची चर्चा सुरु झाली होती.

मिस्ट्री मॅनसोबत दिसली क्रिती

कबीर बहियाला क्रितीची बहीण नुपूरसोबतच्या फोटोतही पाहिले गेले आहे. रिपोर्टनुसार, नुपूरनेच कबीरची तिच्या बहिणीसोबत ओळख करून दिलीये. काही दिवसांपूर्वी क्रिती सेननचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये ती लंडनच्या रस्त्यांवर एका मिस्ट्री मॅनसोबत हातात हात घालून फिरत असल्याचं दिसत होतं. त्यानंतर ही कोणाला तरी डेट करत असल्याची चर्चा रंगली होती.

कोण आहे कबीर बहिया

कबीर बहिया हा लंडनमध्ये राहतो. तो शाळेत क्रिकेट खेळायचा. कबीर हार्दिक पांड्या आणि इतर क्रिकेटपटूंना देखील भेटत असतो. सोशल मीडियावर त्याचे अनेक क्रिकेटर्ससोबतचे फोटो आहेत. रिपोर्टनुसार कबीरचा जन्म नोव्हेंबर 1999 मध्ये झाला होता. तो सध्या 24 वर्षांचा आहे. तर क्रिती 33 वर्षांची आहे. कबीरने 2018 मध्ये इंग्लंडमधील सॉमरसेट येथील मिलफिल्ड नावाच्या बोर्डिंग स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. त्याने आपल्या शालेय दिवसातील अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 2015 मधील एक चित्र देखील आहे, ज्यामध्ये तो मिलफिल्ड क्रिकेट ग्राउंडवर क्रिकेट खेळत आहे.

वडिलांचा करोडोंचा व्यवसाय

कबीर हा अतिशय श्रीमंत कुटुंबातील आहे. त्याचे वडील कुजिंदर बहिया हे यूके ट्रॅव्हल एजन्सी साउथॉल ट्रॅव्हलचे संस्थापक आहेत. 2019 च्या संडे टाइम्सच्या अहवालानुसार, कुंजीदारची एकूण संपत्ती £427 दशलक्ष होती.

कबीरच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर तो एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनीसोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतील. 2024 मध्ये जेव्हा क्रिती, नुपूर आणि त्यांच्या जवळच्या मैत्रिणी धोनी आणि साक्षीला दुबईत भेटल्या तेव्हा कबीरही तिथे होता. रेडिटवर क्रिती आणि कबीरचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.