
इंग्लंड विरुद्ध Ashes सीरीजच्या पहिल्या टेस्ट मॅचसाठी ऑस्ट्रेलियन टीमची घोषणा झाली आहे. पहिला कसोटी सामना 21 नोव्हेंबरपासून पर्थ मध्ये सुरु होणार आहे. पॅट कमिन्सला दुखापत झाल्याने दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथकडे ऑस्ट्रेलियन टीमचं नेतृत्व सोपवलं आहे. या टीममध्ये वनडे आणि T20I टीमचा कॅप्टन मिचेल मार्शला जागा दिलेली नाही. मागच्या महिन्यात पर्थ टेस्ट मॅच दरम्यान बिअर पिणार असल्याचं सांगून मिचेल मार्शने सर्वांना धक्का दिला होता. हे बोलणं त्याला भारी पडलं. म्हणूनच त्याला कदाचित टीममध्ये जागा दिलेली नाही. चीफ सिलेक्टर जॉर्ज बेली सुद्धा या मुद्यावर मोठी गोष्ट बोललेत.
Ashes सीरीजसाठी मिचेल मार्शला ऑस्ट्रेलियन टीममध्ये का निवडलं नाही? ते कारण चीफ सिलेक्टर जॉर्ज बेली यांनी सांगितलं. आम्ही आयसीसीमध्ये गेलेलो, अंपायर्सना मैदानावर ब्रेथलायजर घेऊन जायची परवानगी नाही, हा तिथे मुद्दा होता. पहिला चेंडू टाकेपर्यंत त्याने सहा बिअर प्याल्या असतील, तर कठीण आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल
मागच्या महिन्यात एका इंटरव्यू दरम्यान मस्करीमध्ये मिचेल मार्शने Ashes मध्ये खेळण्याबद्दल असं म्हटलेलं की, ‘मी पर्थ टेस्टच्या पहिल्या दिवशी लंच पर्यंत सहा बिअर प्यालेल्या असतील’ पण टेस्ट क्रिकेटमध्ये पुन्हा खेळण्याबद्दल मी कधी नाही म्हणणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेला. मिचेल मार्श डिसेंबर 2024 मध्ये टीम इंडिया विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला या फॉर्मेटमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.
28.53 च्या सरासरीने 2083 धावा
मिचेल मार्शबद्दल इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने मागच्या महिन्यात एक सल्ला दिलेला. मार्शला AShes सीरीजच्या पहिल्या कसोटीत ओपनिंगला उतरवलं पाहिजे. Ashes साठी पहिल्या दोन दिवसांचं तिकीट आहे असं मार्शने म्हटलेलं. ABC रेडिओवर माजी कोच डॅरेन लेहमॅन यांनी मार्शला विचारलं की, त्याला ओपनिंग करायची आहे का?. मार्शने हसून उत्तर देणं टाळलं. मिचेल मार्श आतापर्यंत 46 कसोटी सामने खेळलाय. त्यात 80 इनिंगमध्ये 28.53 च्या सरासरीने 2083 धावा केल्या आहेत. यात तीन शतकं आणि 9 अर्धशतकं आहे. या दरम्यान त्याने 51 विकेट सुद्धा घेतलेत.