AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AFG vs BAN : सामन्यासह मालिकेचा लागणार निकाल, कोण जिंकणार?

Afghanistan vs Bangladesh 3rd And Final Odi : अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिका 1-1 ने बरोबरीत असल्याने तिसरा सामना हा रंगतदार होणार आहे.

AFG vs BAN : सामन्यासह मालिकेचा लागणार निकाल, कोण जिंकणार?
Afghanistan vs Bangladesh Odi Series 2024Image Credit source: afghanistan cricket X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Nov 10, 2024 | 10:03 PM
Share

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशला पराभूत करत विजयी सलामी दिली. बांगलादेशने त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पलटवार केला. बांगलादेशने करो या मरो असलेल्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आणि मालिकेतील आव्हान कायम ठेवलं. बांगलादेशच्या या विजयासह मालिका 1-1 ने बरोबरीत आली. त्यामुळे आता तिसरा आणि अंतिम सामना हा रंगतदार होणार असून उभयसंघात कडवी झुंज पाहायला मिळू शकते. हा सामना केव्हा आणि कुठे पाहता येईल? जाणून घेऊयात.

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश तिसरा सामना केव्हा?

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश तिसरा सामना सोमवारी 11 नोव्हेंबरला होणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश तिसरा सामना कुठे?

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश तिसरा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह येथे होणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश तिसरा सामना टीव्हीवर भारतात दाखवण्यात येणार नाही.

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश तिसरा सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश तिसरा सामना मोबाईलवर फॅनकोड एपवर पाहायला मिळेल.

तिसरा आणि अंतिम सामना, कोण जिंकणार मालिका?

बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तनजीद हसन, सौम्या सरकार, मेहिदी हसन मिराझ, तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली (विकेटकीपर), नसुम अहमद, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, झाकीर हसन, रिशाद हुसेन आणि नाहिद राणा.

अफगाणिस्तान टीम: हशमतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, अल्लाह गझनफर, नांगेयालिया खरोटे, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, इक्रम अलीखिल, दारिश रसूली, रियाझ हसन, नूर अहमद, अब्दुल मलिक, बिलाल सामी आणि नावेद झद्रान.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...