AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 | Rashid Khan याची करामत, अवघ्या एका ओव्हरमध्ये मॅच फिरवली

Asia Cup 2023 AFG vs SL Rashid Khan | अफगाणिस्तानचा घातक फिरकी बॉलर राशिद खान याने एका ओव्हरमध्ये श्रीलंकेला 2 झटके दिले.

Asia Cup 2023 | Rashid Khan याची करामत, अवघ्या एका ओव्हरमध्ये मॅच फिरवली
| Updated on: Sep 05, 2023 | 6:37 PM
Share

लाहोर | अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात आशिया कप 2023 मधील साखळी फेरीतील सहावा आणि अखेरचा सामना खेळवण्यात येत आहे. श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या पाथुम निशांका आणि दिमुथ करुणारत्ने या सलामी जोडीने 63 धावांची आश्वासक भागीदारी केली. मात्र अफगाणिस्तानच्या बॉलिंगसमोर श्रीलंकेने ठराविक अंतराने विकेट्स गमावले. एका बाजुला श्रीलंकेचे विकेट जात होते. मात्र कुसल मेंडीस याने एक बाजू लावून धरली. कुसल शक्य तसं टॉप गिअर टाकून स्कोअरकार्ड धावता ठेवत होता. मात्र अफगाणिस्तानच्या राशिद खान याने आपल्या फिरकीसमोर एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या आणि श्रीलंकेला बॅकफुटवर टाकलं.

राशिदची निर्णायक ओव्हर

राशिदने सामन्यातील 40 व्या ओव्हरमध्ये श्रीलंकेला 2 झटके दिले. त्यामुळे श्रीलंका काहीशी पिछाडीवर गेली. राशिदने या 40 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर कुसलला रनआऊट केलं. राशिदच्या 40 व्या ओव्हरमधील पहिलाच बॉल दासून शनाका याने मारला. दासूनने मारलेला फटका राशिदच्या दिशेने गेला. राशिदने कॅच सोडली. मात्र बॉल एक टप्पा घेऊन स्टंपला लागला. त्या दरम्यान नॉन स्ट्राईक एंडवर असलेला कुसल मेंडीस हा क्रीझहबाहेर होता. राशिदच्या हातून सुटलेला बॉल स्टंपवर एक टप्पा घेऊन गेला. अशाप्रकारे कुसल मेंडीस दुर्देवी ठरला आणि रनआऊट झाला. कुसल नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. कुसलने 84 बॉलमध्ये 92 धावा केल्या.

त्यानंतर राशिद खान याने त्याच ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर कॅप्टन दासून शनाका याला क्लिन बोल्ड केलं. शनाका 5 धावांवर आऊट झाला. राशिदने अशा प्रकारे 2 विकेट घेतल्या. मात्र मेंडीस रनआऊट झाल्याने राशिदच्या खात्यात मात्र 1 विकेटच गेली. दरम्यान राशिदने 10 ओव्हमध्ये 63 धावा देऊन एकूण 2 विकेट्स घेतल्या.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हश्मतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरुबाझ (विकेटकीपर), इब्राहीम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नईब, करीम जनत, राशिद खान, फझलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.