मोठी बातमी! अफगाणिस्तानची 2027 वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री; ‘या’ संघाच्या आशेवर फिरले पाणी!

Afghanistan Qualify for 2027 ODI World Cup: वनडे वर्ल्डकप स्पर्धा पुढच्या वर्षी होणार आहे. या स्पर्धेसाठी आता पात्रता फेरीचे सामने सुरू होणार आहे. असं असताना अफगाणिस्तानने वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी थेट एन्ट्री मारली आहे. कसं काय ते समजून घ्या.

मोठी बातमी! अफगाणिस्तानची 2027 वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री; या संघाच्या आशेवर फिरले पाणी!
मोठी बातमी! अफगाणिस्तानची 2027 वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री; 'या' संघाच्या आशेवर फिरले पाणी!
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 08, 2026 | 4:05 PM

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं स्वरूप कसं असेल या बाबत आयसीसीने आधीच जाहीर केलं आहे. आता या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या संघाची नावंही जाहीर होत आहे. असं असताना अफगाणिस्तानने या वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत एन्ट्री मारली आहे. अफगाणिस्तानने वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं तिकीट पक्कं केलं आहे. अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. एकही चेंडू या सामन्यात टाकला गेला नाही. तर दुसऱ्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानने आयर्लंडला 92 धावांनी लोळवलं. या विजयासह अफगाणिस्तानला वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं तिकीट मिळालं. तर आयर्लंडच्या थेट पात्रतेच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

पावसामुळे आयर्लंडचं स्वप्न भंगलं

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये आयर्लंडचा संघ 12व्या स्थानावर आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 5-0 ने क्लीन स्विप देणं आवश्यक होतं. तसेच वेस्ट इंडिजच्या कामगिरीवरही गणित अवलंबून होतं. पण पहिल्या वनडे सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही आणि आयर्लंडच्या आशेवर पाणी पडलं. त्यामुळे 5-0 ने क्लीन स्विप देण्याचं स्वप्न भंगलं. त्यात दुसरा सामना गमावल्याने होत्या नव्हत्या आशाही संपुष्टात आल्या. आता आयर्लंडला वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत जागा मिळवण्यासाठी ग्लोबल क्वॉलिफायर टूर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघाची पात्र कशी ठरते?

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी नियम अगदी स्पष्ट आहे. आयसीसी नियमानुसार या स्पर्धेत यजमानपद भूषवणारे संघ थेट पात्र ठरतात. त्यामुळे दक्षिण अफ्रिका आणि झिम्बाब्वे या संघाने थेट एन्ट्री मिळाली आहे. यजमान देश सोडले तर इतर देशांना आयसीसी वनडे क्रमावारीवरून निवडलं जातं. क्रमवारीतील टॉप 8 देशांना थेट एन्ट्री मिळते. आयसीसीकडून थेट पात्रतेसाठी 30 सप्टेंबर 2026 ची कट ऑफ डेट निश्चित केली आहे. सध्या या क्रमवारीत भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांनी जागा पक्की केली आहे. यासह बांग्लादेश थेट पात्र ठरेल, अशी स्थिती आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us