IND vs WI 2nd ODI: ‘कमॉन, सेलिब्रेशन तो बनता हैं”, पहा ड्रेसिंग रुम मध्ये टीम इंडियाच्या जोरदार सेलिब्रेशनचा VIDEO

INDvsWI 2nd ODI: पोर्ट ऑफ स्पेन मध्ये सलग दुसरा वनडे सामना जिंकून भारताने वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WI) मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

IND vs WI 2nd ODI: कमॉन, सेलिब्रेशन तो बनता हैं, पहा ड्रेसिंग रुम मध्ये टीम इंडियाच्या जोरदार सेलिब्रेशनचा VIDEO
shikhar dhawan
Image Credit source: screengrab
| Updated on: Jul 25, 2022 | 11:00 AM

मुंबई: पोर्ट ऑफ स्पेन मध्ये सलग दुसरा वनडे सामना जिंकून भारताने वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WI) मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. तिसरा वनडे सामना आता फक्त औपचारिकता मात्र आहे. वेस्ट इंडिजने दुसऱ्या वनडेत भारताला 312 धावांचं मोठं लक्ष्य दिलं होतं. पण टीम इंडियाच्या फलंदाजांनी हार मानली नाही. त्यांनी अशक्य दिसणारा विजय खेचून आणला. 3/79 या स्थितीतून भारताने विजयी लक्ष्यापर्यंत धडक मारली. खऱ्या अर्थाने अक्षर पटेल (Axar Patel) या विजयाचा नायक आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना अक्षरक्ष: झोडून काढलं. या दिमाखदार विजयानंतर सेलिब्रेशन तो बनता हैं. कॅप्टन शिखर धवन (Shikhar Dhawan) या सेलिब्रेशन मध्ये आघाडीवर होता. मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रुम डोक्यावर उचलून घेतली. तिथे जोरदार सेलिब्रेशन केलं. रिल मास्टर शिखर धवनने त्याच्या इन्स्टाग्रामवर या विजयाचा व्हिडिओ शेयर केलाय.

भारताने वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा वनडे सामना 2 विकेट आणि 2 चेंडू राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने 50 षटकात 311 धावा केल्या. टीम इंडियाने 49.4 षटकात हे लक्ष्य गाठलं.

ड्रेसिंग रूम मध्ये विजयाची नशा

टीम इंडियाने ड्रेसिंग रुम मध्ये या विजयाचं सेलिब्रेशन केलं. यात सर्व खेळाडू तुम्हाला एकच गोष्ट करताना दिसतील. सगळेच प्लेयर्स आपली मसल्स पावर दाखवतायत. याच नेतृत्व स्वत: कॅप्टन शिखर धवन करताना दिसतो.

श्रेयस अय्यर-संजू सॅमसनचं अर्धशतक

एकवेळ भारताची स्थिती 18 षटकानंतर 3 बाद 79 होती. त्यावेळी श्रेयस अय्यर (63) आणि संजू सॅमसनने (54) भारताचा डाव सावरला. दोघांनी आपआपली अर्धशतकं फटकावतानाच 99 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दीपक हुड्डा (33) आणि अक्षरने झटपट 50 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. अखेरच्या षटकात अक्षर पटेलने तुफान फटकेबाजी केली. त्याने 35 चेंडूत नाबाद 64 धावा फटकावल्या. यात 3 चौकार आणि 5 षटकार होते. आवेश खानने देखील दोन चौकार लगावले. त्यामुळे अखेरच्या 3 चेंडूत विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती. अक्षर पटेलने त्यानंतर कायली मेयर्सने टाकलेल्या चौथ्या लो फुल टॉस चेंडूवर लाँग ऑफला षटकार खेचला. त्यामुळे वेस्ट इंडिजचा विजयाच स्वप्न भंग पावलं. भारताने दुसऱ्यासामन्यासह मालिकाही खिशात घातली.