MS Dhoni : ‘9 नंबरवर बॅटिंगला येणार असशील, तर त्यापेक्षा खेळूच नको’, प्रसिद्ध क्रिकेटपटूच धोनीबद्दल स्पष्ट मत

MS Dhoni : एमएस धोनीची भारतात महान क्रिकेटपटूंमध्ये गणना होते. अनेक खेळाडू घडवण्यात धोनीच मोठ योगदान आहे. त्याच एमएस धोनीवर आता टीका सुद्धा होत आहे. धोनीची रणनिती बघून काही क्रिकेटपटूंनी त्याच्याविषयी एकदम स्पष्टपणे आपलं मत मांडलय.

MS Dhoni : '9 नंबरवर बॅटिंगला येणार असशील, तर त्यापेक्षा खेळूच नको', प्रसिद्ध क्रिकेटपटूच धोनीबद्दल स्पष्ट मत
MS Dhoni
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 12:03 PM

धर्मशाला येथे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर काल चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्समध्ये सामना झाला. या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सने 168 या धावसंख्येचा यशस्वी बचाव केला. रवींद्र जाडेजा आणि तृषार देशपांडे या CSK बॉलर्सनी जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यामुळे हे शक्य झालं. पंजाब किंग्सने 9 विकेट गमावून 139 धावा केल्या. 28 धावांनी मिळवलेल्या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये CSK ची टीम पुन्हा टॉप 4 मध्ये आलीय. चेन्नईने मॅच जिंकली असली, तरी क्रिकेट पंडित मात्र, एमएस धोनीवर नाराज आहेत. जबाबदारी घेत नसल्याबद्दल त्यांनी एमएस धोनीवर टीका केली. IPL 2024 च्या सीजनमध्ये धोनीच्या बॅटिंग पोजिशनबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. धोनी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 224.49 त्या स्ट्राइक रेट आहे. मात्र, तरीही धोनी वरच्या स्थानावर फलंदाजीसाठी येत नाहीय.

रविवारी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात धोनी करिअरमध्ये पहिल्यांदा 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याच्याआधी मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर आले. इरफान पठाणला हे पटलं नाही. कॉमेंट्री करणाऱ्या इरफान स्टार स्पोर्ट्सवर बोलताना यावर स्पष्ट शब्दात नापसंती व्यक्त केली. “दीर्घकाळाचा विचार करता, सीएसकेने प्लेऑफमध्ये प्रवेश केला, तर त्यांना या स्ट्रॅटजीचा फायदा होणार नाही” असं इरफान म्हणाला.

‘तो 42 वर्षाचा आहे हे मला माहितीय’

“एमएस धोनी 9 व्या नंबरवर बॅटिंगला येणार त्याचा सीएसकेला फायदा होणार नाही. तो 42 वर्षाचा आहे हे मला माहितीय. पण तो सॉलिड फॉर्ममध्ये आहे. त्याने वरती येऊन फलंदाजीची जबाबदारी घेतली पाहिजे. त्याने 4-5 ओव्हर फलंदाजी केली पाहिजे. तो एक किंवा दोन ओव्हर बॅटिंग करतो, दीर्घकाळाचा विचार करता, सीएसकेला त्याचा काही फायदा होणार नाही” असं इरफान पठाण म्हणाला.

‘…तर त्याला टीममधून ड्रॉप केलेलच चांगलं’

“सीएसकेला त्यांचे 90 टक्के सामने जिंकायचे आहेत. ते प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतात. फॉर्ममध्ये असलेल्या सिनियर खेळाडू म्हणून धोनी वरती फलंदाजीला आला पाहिजे. त्याने आधी काहीवेळ असं केलय तसं करुन आता चालणार नाही” असं पठाण म्हणाला. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने सुद्धा संताप व्यक्त केला. “धोनीला खालच्या क्रमांकावर बॅटिंगला यायच असेल, तर त्याला टीममधून ड्रॉप केलेलच चांगलं” असं स्पष्ट शब्दात हरभजन म्हणाला.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.